नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे.
दि.26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मामा चौक उमरी येथील बसस्टॅंड जवळ एका 30 वर्षीय युवकाचा खून पाच जणांनी केला होता. त्या संदर्भाने 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास गुन्हा क्रमांक 433/2024 दाखल झाला. जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार असणाऱ्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अत्यंत जलदगतीने या प्रकरणाचा मागोवा काढला आणि उमरी येथील अनिल माधव अडगुडवाडची हत्या करणाऱ्या पाच जणांपैकी तीन युवकांना ज्यात नितेश उर्फ एका नारायण अडगुलवाड(26), आशिष बाबुलाल जयस्वाल (26) आणि विश्र्वनाथ शंकर शिंदे (26) सर्व रा.उमरी जि.नांदेड यांना ताब्यात घेतले.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरेश गुरव, धर्माबाद येथील पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपते यांनी ही कामगिरी करणारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार किशन मुळे, विलास कदम, संतोष बेल्लुरोड, संदीप घोगरे, भिमराव लोणे आदींचे कौतुक केले आहे. इतर दोन आरोपी अजून फरार आहेत.
संबंधीत बातमी….