नांदेड (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. पण काही नतदृष्टे सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंघ यांच्या मृत्यूनंतर चुकीच्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. याचे वाईट वाटते.
कधीही कोणतीही चिखलफेक झाली नसणारा विरळा व्यक्ती अशी डॉ. मनमोहन सिंघ यांची ख्याती होती, असे चव्हाण म्हणाले. देशाचे पंतप्रधान, वित्तमंत्री, वित्त आयोगाचे अध्यक्ष, गर्व्हनर ऑफ आरबीआय अशी अनेक पदे अनुभवली असताना सुद्धा त्यांच्यासाठी त्यांची 800 ही गाडी लाडकी होती. याावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज येतो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. मला स्वत:ला त्यांच्या निधनाचे मोठे दु:ख आहे, कारण डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि त्यांचे नांदेडवर जास्त प्रेम होते. नांदेड येथे सन 2008 मध्ये साजरा झालेल्या गुर-ता-गद्दी सोहळ्यासाठी त्यांनीच निधी दिला होता. याची आठवण करून ते विरळे व्यक्तीमत्व होते, अशा शब्दांत आपल्या भावना खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
दुर्देवाची बाब म्हणजे सध्याच्या अंधभक्तांच्या या दुनियेत काही जणांनी सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंघ यांच्याबद्दल घाणेरडे शब्द लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, हे पाहून अत्यंत दु:ख वाटले. डॉ. मनमोहन सिंघ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावाई, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांनी एक दशक भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. ते वित्त मंत्री असताना त्यांनी जवळपास पाच ते सहा वेळेस भारताचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी मनरेगा ही योजना दिली. त्यांनी आरटीई माध्यमाने शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांनी आरटीआयमार्फत माहितीचा अधिकार दिला, त्यांनी अन्न योजना दिली, अशा या अर्थशास्त्री असलेल्या डॉ. मनमोहन सिंघ बद्दल, खुदा भी आसामसे जब जमी पर देखता होगा, मेरे मेहबुब को किसने बनाया ये सोचता होगा या शब्दांसह वास्तव न्यूज लाईव्ह डॉ. मनमोहन सिंघ यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करत आहे.