देगलूर (प्रतिनिधी)-जुने बसस्थानक देगलूर येथे बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असणाऱ्या 65 वर्षीय महिलेचे 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तिच्या गळ्यातनू चोरट्यांनी काढून घेतले आहे.
चंदाबाई इरशेट्टी गंटावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जुने बसस्थानक देगलूर येथे देगलूर ते येरगी जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 587/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार तलवारे अधिक तपास करीत आहेत.