नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदुळ हे अन्न गाडीची बदली करत असतांना शिवाजीनगर पोलीसांनी पकडले आहे. या एकूण 5 गाड्या आहेत. याचा पंचनामा तहसील कार्यालय करत आहे.
आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात नवा मोंढा परिसरात पोहचले. त्या ठिकाणी राशनचा गहु आणि तांदुळ भरलेल्या पाच गाड्या भेटल्या. त्यात एम.एच.26 ए.डी.8096, एम.एच.47 ए.एस.1771 या छोट्या गाड्या आहेत. तसेच एम.एच.26 सी.एच.9297, एम.एच.26 ए.डी.1458 हे दोन ट्रक आहेत आणि एम.एच.26 एच.8073 ही आयचर गाडी आहे. या गाड्यांमध्ये गहु आणि तांदुळ भरलेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी तज्ञ व्यक्ती म्हणून याची माहिती तहसील विभागाला दिला. त्यानंतर तहसील विभागाचे अधिकारी व कर्मचारी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे पोहचले आहेत. ते सध्या तेथे असलेल्या धान्याचा पंचनामा करत आहेत. त्यानंतर तहसील विभागाच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांनी सांगितले.