नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड पोलीसांनी जाहूर चौकात एक हायवा गाडी पकडली आहे. त्यात चोरून, बिना परवानगी, बिना कागदपत्र असलेली लालवाळू भरलेली होती. 20 लाखांची हायवा गाडी आणि 45 हजारांची लाल वाळू असा 20 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुखेड येथील पोलीस अंमलदार प्रदीप रामराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 डिसेंबर रोजी सकाळी मुखेडचे पोलीस पथक जाहूर चौकात आले असतांना देगलूर रस्त्यावरून हायवा गाडी क्रमांक टी.एस.09 यु.डी.1314 आली. तिला थांबून विचारणा केली असता त्यामध्ये लाल वाळू भरलेली होती. याबद्दल वाहतुक परवान्याचे कागदपत्रे, वाळूची रॉयल्टी भरलेली कागदपत्रे मागितली असता ती माझ्याकडे नाहीत. मी मालकाच्या सांगण्यावरून ही वाळू वाहतुक करीत असल्याचे सांगितले. या गाडीमध्ये आकाश सोपान वाघमारे, मारोती पुंडलिक जंगमवाड दोघे रा.राजूरा ता.मुखेड जि.नांदेड यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 194/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी, मुखेडचे पोलीस निरिक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शना पोलीस अंमलदार प्रदीप शिंदे यांनी ही कार्यवाही केली आहे.