नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे दोन घरफोड्या, भाग्यनगर पोलीस ठाण्यात एक घरफोडी, विमानतळ पोलीस ठाण्यात एक घरफोडी, देगलूर आणि कुंटूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या असे एकूण सहा प्रकार घडले असून त्यात 7 लाख 78 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केला आहे.
कलानगर देगलूर येथील रामराव गोविंदराव शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 डिसेंेबरच्या सायंकाळी 6 ते 23 डिसेंबरच्या सकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांच्या घरात आणि त्यांच्या शेजारी शैलेश हनमंत म्हैत्रे हे बाहेरगावी गेले असतांना चोरट्यांनी त्या दोघांचे घरफोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 19 लाख 52 हजार रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 584/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक फड करीत आहेत.
देगलूर येथील नवीन बस स्थानकाच्या कॅटींगच्या पाठीमागील लोखंडी खिडकी तोडून कोणी तरी चोरट्यांनी 22-23 डिसेंबरदरम्यान सहा हजार रुपये रोख रक्कम आणि 800 रुपये किंमतीचे किराणा साहित्य असा एकूण 6 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मोहम्मद अबुबकर मोहम्मद मकदुम यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 585/2024 दाखल केला असून पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
शहरातील गजानन मंदिर मालेगाव रस्ता येथे असलेल्या विठाई निवासमध्ये असलेले आशिष प्रकाश संगमवार यांचे घर अज्ञात चोरट्यांनी 21 डिसेंबरच्या सायंकाळी 6.30 ते 22 डिसेंबरच्या सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान फोडले. या काळात आशिष संगमवार हे आपल्या सासुरवाडीला गेले होते. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे 4 लाख 95 हजार 750 रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 643/2024 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के अधिक तपास करीत आहेत.
19 डिसेंबरच्या सकाळी 7.30 ते 8.40 वाजेदरम्यान विश्र्वेश्वर हाऊसींग सोसायटी चैतन्यनगर येथे अमृता प्रकाशराव कनकुंदळे यांचे घरफोडून चोरट्यांनी त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि पुजेचे साहित्य असा एकूण 86 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी विमानतळद्य पोलीसांनी गुन्हा क्रमांक 511/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक मस्के हे करीत आहेत.
देगलूर शहरात तळगल्ली येथे प्रदीप शंकरराव येनगुुंदे यांचे जनरल स्टोअर आहे. 22 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता त्यांच्या दुकानाच्या काऊंटरमधील 7 हजार रुपये रोख रक्कम कोणी तरी चोरुन नेली आहे. देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 583/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अंमलदार बानु यांच्याकडे देण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील सालेगाव शिवारात बळवंत मोहनराव शिंदे यांच्या शेतात असलेले सोलार कंपनीचे पंप 30 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी 23 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजेच्यासुमारास चोरून नेले आहे. कंुंटूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 273/2024 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कंधारे हे करीत आहेत.