नांदेड-गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळाजाळून निषेध करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल परवा राज्यसभेच्या सभागृहात भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज दि.20 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेड शहरातील आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यासमोर अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, विशाल एडके, युवा उपाध्यक्ष व सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अतिश ढगे, देवानंद मोगले, नवनाथ वाकडे,सम्मा सावंत, स्वप्निल वाघमारे, धम्मा जोंधळे यांची उपस्थिती होती. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना कायदेशीर अटक केली आहे.