नांदेड जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर ‘फर्टिलिटी ओपीडी ‘ सुरू

 नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा
नांदेड – बदललेली जीवनशैली व ताण तणावाचे वातावरण यामुळे अनेक ठिकाणी योग्य उपचार व नेमक्या वैद्यकीय विश्लेषण व सल्ल्या अभावी वंध्यत्व व उशिरा गर्भधारणेची समस्या समाजामध्ये जाणवते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून नागरिकांनी शासकीय आरोग्य संस्थामध्ये या संदर्भातील मार्गदर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या समाजामध्ये वंध्यत्वाचे व उशिराने गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च 2024 पासून जिल्हा प्रशासन व श्री गुरूगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यातर्फे वंधत्व निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 6 उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय याठिकाणी फर्टिलिटी ओपीडी अर्थात वंध्यत्व निवारणासाठी विशेष ओपीडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाते.

आतापर्यंत सरासरी प्रत्येक महिन्यात 500 पेक्षा जास्त ‘ नागरिकांनी या ओपीडीला भेट देऊन आपल्या समस्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अंकुर फुटण्यास यामुळे मदत झाली आहे.
या ओपीडीमध्ये आलेल्या नागरिकांच्या अनुभवावरून हे लक्षात येते की, बहुतांश जीवनशैली व ताणतणावामुळे उशिराने गर्भधारणा होणे किंवा न होणे अशा प्रकारे त्याचे परिणाम होतात. तसेच मुलभूत स्वरुपाच्या तपासण्या करून उदाहरणार्थ सिमेन अॅनालिसिस,फॉलिक्युलर स्टडी तसेच हॉर्मोन्स तपासणी हे करून वंध्यत्वाचे किंवा उशिरा गर्भधारण होण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांच्या जीवनात नवीन अंकुर फुलण्यास मदत होत आहे. आगामी काळात हा उपक्रम मोठ्याप्रमाणत नांदेड जिल्ह्यातील नागरिकांसाठी फलदायी अशाप्रकारचा राहणार आहे. तसेच या सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रावर देखील उपलब्ध करून देण्याकडे प्रशासनाचा कल असून नागरिकांनी अत्यंत नैसर्गिक असणाऱ्या या समस्येसाठी योग्य सल्ला घेण्याच्या आवाहनही जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!