नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
लक्ष्मण मोहनराव रामपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 डिसेंबरच्या सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान ते आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून आपल्या शेतात गेले होते. परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते आणि घरातील सोन्याचे दागिणे 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे आणि 500 रुपये रोख रक्कम असा 4 लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 344/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक रोकडे अधिक तपास करीत आहेत.