पहिल्यांदा लोकसभेत आणि ते सुध्दा संविधानाच्या सुवर्ण वर्षाच्या निमित्ताने भाषण देतांना प्रियंका गांधी यांनी सर्वांना धुवून काढले. अत्यंत घाणेरडे शब्द वापरून सभागृह गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यामुळे नक्कीच लाज वाटायला हवी. प्रियंका गांधींनी कोणत्याही मुद्यावर सरकारला सोडले नाही. पण बोलतांना काळजात घुसतील अशा शब्दांचा वापर केला. जणू असे वाटत होते की, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच बोलत आहेत. 45 मिनिटांच्या भाषणात एकदाच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथसिंह अत्यंत शिस्तीमध्ये त्यांचे सर्व भाषण ऐकत होते.
पहिल्यांदा राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर संसदेत पोहचल्या. संसदेत आल्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पण त्या दरम्यान त्यांनी कोणत्याही मुद्यावर बोलल्या नाहीत. फक्त आपल्या भावासह इतर सदस्यांच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या सत्ताधिशांना तंबी मात्र देत होत्या. काल दि.13 डिसेंबर रोजी भारताच्या संविधानाला 75 वर्ष पुर्ण झाली. यानिमित्ताने संविधानावर चर्चा करण्यासाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. ते सत्र आजही चालणार आहे आणि या सत्रात प्र्रियंका गांधी यांना बोलण्याची संधी मिळाली तेंव्हा त्यांनी सर्व प्रथम भारत देश हा भारतीय संविधानावर चालतो. कोणाच्या भितीने नाही आणि केंद्र सरकारने सर्वत्र भितीचे वातावरण तयार करून देश चालवत आहेत. पण भितीची परिस्थिती जास्त काळ टिकत नाही. कारण भारत भारतीय संविधानावर चालतो, संघाच्या संविधानावर नाही. हे बोलत असतांना संघ या शब्दावर त्यांनी दिलेला जोर म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पध्दतीने खालच्या स्तराचे बोलतात. त्याचे ते उत्तर होते. कारण आपण बोलत असतांना जेंव्हा एखाद्या शब्दावर जोर देतो. त्याचा अर्थ भरपूर काही असतो. आमच्या भाषेतच लिहायचे असेल तर खुप अवघड आहे. ते लिहुन आम्ही वाचकांना अडचणीत आणू इच्छीत नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या भयमुक्त वातावरणातच आज 75 वर्षापर्यंत अभिव्यक्तीची कोणतीही पध्दती बदललेली नाही आणि त्यानुसारच देश चालत आहे आणि ही संविधानाने भारतीयांसाठी लावून दिलेली ज्योत नेहमी तेवत राहिली आणि पुढे सुध्दा राहणार आहे. या भितीच्या वातावरणात सुध्दा आम्ही अनेक मुद्यांवर निदर्शने केली, आंदोलने केली. कारण हा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. जनता जेंव्हा नाराज होते. तेंव्हा ती सत्तेला आव्हाण देत असते आणि आजही ही प्रक्रिया थांबलेली नाही. पण आजच्या परिस्थितीत हे सर्व बंद झाले आहे कारण ते भितीचे वातावरण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु सुध्दा आपल्या विरोधकांना बोलण्याची संधी देत होते आणि ते स्वत: सभागृहात हजर राहत होते. पत्रकार असेल, विरोधी पक्षाचा नेता असेल, जनतेतला माणुस असेल त्याला खरे न बोलण्यासाठी भिती दाखवली जाते आणि त्या भितीच्या वातावरणातच आज भारत जगत आहे. कोणाविरुध्द ईडी, कोणाविरुध्द इन्कम टॅक्स, कोणाविरुध्द सीबीआय या प्रकारातच जनता वावरत आहे. अनेकांना जेलमध्ये टाकले गेले, अनेक मुख्यमंत्री जेलमध्ये पाठविले गेले. अशा पध्दतीचे भितीचे वातावरण तयार करणारे स्वत: आता भितीत जगत आहेत. तुमच्याविरुध्द होणाऱ्या वक्तव्याला घाबरता, तुमच्याविरुध्द केल्या जाणाऱ्या विश्लेषणाला घाबरता का? आम्ही सांगतोय की, चर्चा करा पण चर्चा करण्याची हिम्मत या सरकारमध्ये नाही. हे बोलत असतांना सत्ताधारी पक्षांकडून जनतेमध्ये विविध आहे अशी ओरड झाली. यावर न रागवता प्रियंका गांधी म्हणाल्या हो मलाही माहित आहे की, जनतेमध्ये विवेक आहे. मी या सभागृहात नवीन आहे. 15 दिवसांपासून येत आहे. पण 15 दिवसात भारताचे पंतप्रधान फक्त 10 मिनिटे सभागृहात आल्याचे मी पाहिले आहे. याला काय म्हणावे? माझ्या मते त्यांना भिती वाटते.
आज देशाचे वातावरण असे आहे की, ते या अगोदर इंग्रजांच्या काळात होते. महाराष्ट्राची सरकार अडीच वर्षापुर्वी पैशांच्या आधारे खरेदी केली गेली. हिमाचल प्रदेशची सरकार तोडली का असे केले. जनतेत विवेक आहे म्हणता नाही. हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रच्या सरकार सुध्दा जनतेनेच निवडल्या होत्या. तुम्ही मागितल्याप्रमाणे 400 पार खासदार जनतेने तुम्हाला दिले नाही. म्हणूनच तुम्हाला संविधान बदला आले नाही हा सुध्दा जनतेचा विवेक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संविधान संविधान बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले की, भारताच्या संविधानाची खरी रक्षा भारतीय जनता करते. नारी शक्तीचा अधिनियम मंजूर केला. पण तो अंमलात आणला नाही. आजची नारी पुढील 10 वर्ष त्याच्या अंमलबजावणीची वाट पाहिल काय? याच्यासह भारताच्या पंतप्रधानाबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, आजच्या राजाला रुप बदलाची आवड आहे. पुर्वी राजे जनतेमध्ये जावून वेशबदलून जनता आपल्या बद्दल काय बोलते हे ऐकत होते. पण या राजाला जनतेत जाण्याची हिम्मत नाही.आजचे सरकार अडाणी सरकार असल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर भरपूर आरोप केले आणि हे आरोप करत असतांना शब्दांचा वापर एवढा सुंदर होता की, त्याला तोड नाही. पंडीत जवाहरलाल नेहरु बद्दल बोलतांना प्रियंका गांधी यांनी त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख केला आणि म्हणाल्या नेहरुंचे सोडा तुम्ही सांगा तुम्ही काय केल आहे. हिम्मत असेल तर एकदा मतदान पत्रिकेवर मतदान घेवून भारतीय जनता किती विवेकशिल आहे हे दाखवून द्या. बोलण्याने काही बोलत नसते. नेहरुंची बरोबरी करू नका. त्यांची बरोबरी जगात कोणी केलेली नाही. आज तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलता परंतू जगामध्ये त्यांची काय किंमत आहे हे एकदा तपासून पाहा म्हणजे तुम्हाला आपली जागा काय आहे हे कळेल.
मोठ-मोठी नेते मंडळी अशा भाषणांना लिहुनच आणतात. राजनाथसिंह बोलत असतांना त्यांनी सुध्दा भाषण वाचूनच दाखविले होते. प्रियंका गांधींच्या हातात सुध्दा कागद होते. पण ते मुद्यांसाठी दिसत होते. कारण अनेक वेळेस त्या आपल्या हातातील कागद खाली ठेवून बोलत होत्याा. त्यांनी सांगितलेला वेश बदलण्याचा राजाचा किस्सा ऐकतांना लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा चेहरा मलीन झालेला होता. अखेर प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता भित्रांच्या हातात हा देश ठेवणार नाही असे सांगून धन्यवाद दिले. प्रियंका गांधी बोलत असतांना असे वाटत होते की, आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच बोलत आहेत. मागील दहा वर्षात केंद्र शासनाने चालविलेली निरंकुश सत्ता आज त्यांच्यामुळे गप्प बसलेली दिसली. म्हणतात आपल्या एखाद्या मुद्यावर कोण्या महिलेने आपल्याला धडा द्यावा तोच धडा प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेतील सत्ताधारी पक्षाला दिला.