अल्पवयीन बालकांनी राहुल गांधीला दिलेल्या गल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांना करावी लागली आत्महत्या

दोन अल्पवयीन बालकांनी आपला गल्ला कॉंगे्रस पक्षाचे राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांना दिला होता. हाच घटनाक्रम त्या बालकांना अनाथ करून गेला. आज बालके एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आणि इतरांचे नाव सांगत आहे. पण त्या बालकांचे ऐकणार कोण. कोण वाली त्या बालकांचा हा प्रश्न भारताच्या लोकशाहीत म्हणावे की, हुकूमशाहीत हा विचार आता लोकांच्या डोक्यात शिरत आहे.


राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती तेंव्हा मध्यप्रदेशमधील आष्टा विधानसभा क्षेत्रात राहणाऱ्या मनोज आणि नेहा परमार यांच्या दोन बालकांनी आपण जमलेल्या पैशांचे गल्ले राहुल गांधी यांना दिले होते. त्या बालकांनी नंतर पत्रकारांना सांगितले होते की, यात्रेदरम्यान राहुल गांधींना पैशांची गरज पडेल म्हणून आम्ही आमचे गल्ले त्यांना दिले आहेत. या परिणाम त्या बालकांच्या जीवनावर झाला. 5 डिसेंबर 2024 रोजी त्या बालकांचे वडील मनोज परमार आणि त्यांची आई सिमा परमार यांनी ईडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. प्राप्त माहिती नुसार मनोज परमार यांनी आपल्या मृत्यूपुर्वी चिठ्ठी लिहिलेली आहे. ती चिठ्ठी सध्या मध्य प्रदेश पोलीसांच्या ताब्यात आहे. खरे तर त्या चिठ्ठला सुरक्षीत करण्याची गरज आहे. नाही तर त्यात कोण-काय करेल याचा आज नेम नाही. आम्ही हे विश्लेषण लिहितांना दगडाला दगड म्हणावेच लागते आणि हिऱ्याला हिरा म्हणावेच लागते हा वाक प्रचार लक्षात ठेवून लिहिले आहे. राहुल गांधींची यात्रा संपून किती दिवस झाले. परंतू अल्पवयीन बालकांनी त्यांना यात्रेदरम्यान आपला पैशांचा गल्ला भेट दिला होता ही बातमीच कोणत्या मिडीयाने दाखवली नाही किंवा कोणत्या प्रसार माध्यमाने छापली नाही. आपल्या आई-वडीलांच्या मृत्यूनंतर तो बालक सांगत होता की, माझ्या कुटूंबामागे आष्टा विधानसभेचे आमदार आणि दुसरे भाजपचे नेता बी.डी. शर्मा यांच्यामुळेच आमच्या कुटूंबामागे ईडी लागली आणि त्याच्या त्रासाला कंटाळून माझ्या आई-वडीलांनी आत्महत्या केली.


ही घटना पाहिल्यावर असे दिसते की, राहुल गांधींना आपला गल्ला भेट देणाऱ्या त्या बालकाच्या गल्यात किती तरी पैसे असतील पण त्याच्या कुटूंबा मागे ईडी लावून देण्याचा प्रकार म्हणजे कॉंगे्रस संपविण्याचा प्रकार आहे. कारण राहुल गांधी म्हणजे कॉंगे्रस नाही तर मनोज परमारसारखे कॉंगे्रस प्रेमी म्हणजे कॉंगे्रस आहे आणि ही कॉंगे्रस कशी संपवायची त्याच्यासाठीचा हा खेळ आहे. मनोज परमार यांनी आपल्या जीवाचे असे करून घेतले म्हणजे सावजनिकपणे कोणी व्यक्ती कॉंगे्रस पक्षाला निधी देणार नाही. केंद्राच्या सरकारने तर निवडणुक बॉन्डच्या माध्यमाने जमवलेले पैसे, त्यावर झालेली चर्चा, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयस यात काही एक तुलना होवू शकत नाही. मग परमारच्या मुलांनी आपला गल्ला राहुल गांधीला भेट दिला. हे त्यांच्या आई-वडीलाचा जीव जाण्यासाठी कारण नक्की झालेले आहे.
भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यंानी जाहीर भाषणांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुध्द 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना उद्देशून म्हणाले होते की, चक्की पिसींग..चक्की पिसींग. मग आता अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांची जप्त झालेली 1 हजार कोटींची संपदा मुक्त करण्यात आली आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेची आणि अजित पवारांची माफी मागणार काय? मग एवढा मोठा घोटाळा मनोज परमारचा होता काय? ज्याच्यावर ईडीने रेड केली. ईडीचे सर्वेसर्वा कुशाल श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात सहाय्यक संचालक संजीवकुमार साहु यांनी मनोज परमारच्या घरी छापा टाकला होता. यात पंचासमक्ष जप्त केल्या मालमत्तेचे विवरण वाचाल तेंव्हा वाचकांचे डोळे विस्फारतील. मनोजर परमार यांचे इंदौरमध्ये एक घर आहे, गणेशपुर आष्टा येथे 1 हजार चौरस फुटाचा भुखंड आहे. आष्टाच्या वार्ड क्रमांक 16 मध्ये 4448 चौरस फुटाचा भुखंड आहे. भोपाळ नाका येथे 1500 चौरस फुटाचा भुखंड आहे आणि शांतीनगर आष्टा येथे 900 चौरस फुटाचा भुखंड आहे. यावेळी लक्षात घ्यायला हवे होते की, गुजरात सरकारने आडाणीला लिहिलेल्या पत्रानुसार 3900 कोटी रुपये अडाणीने कोळ्याचे जास्त बिल लावून चुना लावलेला आहे. त्या अडाणीला ईडीची चौकशी झाली नाही आणि चार भुखंड असणाऱ्या मनोज परमारची ईडी चौकशी झाली. ही हुकूमशाही नव्हे तर काय? त्या पेक्षा शासनाने हुकूमशाहीच जाहीर करून टाकावी . जेणे करून ना निवडणुका ना त्याचा तमाशा.
भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलतांना सांगितले होते की, आंदोलन काळात त्या भागातील 700 युवती गायब आहेत.मग भारताचे सरकार गप्प कसे बसले आहे. यातील गम्मत असे आहे की, सभागृहामध्ये बोललेल्या कोणत्याही वक्तव्यावर कायदेशीर कार्यवाही होत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मंडळी सभागृहामध्ये आपल्या तोंडात येईल ते बोलतात. पण त्यांनी खरे तर बाहेर बोलावे. सभागृहात नव्हे तर त्यांना आपल्या शब्दांमध्ये काय होवू शकते हे कळेल. वन नेशन वन ईलेक्शन ही संकल्पना केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे. किती अवघड प्रकार आहे. गोदी मिडीया सांगत होता की, जे जाहीर करण्याअगोदर जपानचा अभ्यास केला आहे. अहो जपान हा भारतातील केरळ राज्या एवढा देश आहे. जर्मनी तर महाराष्ट्रपेक्षा लहान आहे. बघुया काय होईल. खरे तर आता जनतेने अशा दडपशाही, हुकूमशाहीविरुध्द रस्त्यावर उतरायला हवे. त्यात पत्रकारांनी सुध्दा गणेश शंकर विद्यार्थी यांचा आदर्श समोर ठेवून त्यांच्या पायातील कणा एवढी ताकत जरी आणली तरी या हुकूमशाही विरुध्द लिहिण्याची हिम्मत येईल. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत गणेश शंकर विद्यार्थी यांनी काम केलेले आहे. सध्याच्या व्हाटसऍप युनिर्व्हसीटीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या बद्दल तयार केलेली प्रतिमा किती वाईट आहे. खरे तर 1947 पुर्वी त्यांचा बहुतांश जीवन काळ तुरूंगात गेलेला आहे. परंतू बालकांच्या गल्यामुळे त्यांच्या आई-वडीलांना करावी लागलेली आत्महत्या ही नक्कीच ज्वालामुखी फोडणारी आहे.
आम्ही केलेल्या विश्लेषणाच्या संदर्भासाठी न्युज लॉन्चरचे आशिष चित्रांशी आणि अशोक वानखेडे यांनी केलेल्या चर्चेच्या संदर्भाची लिंक सोबत जोडलेली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!