नांदेड – नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास तसेच सन 2019 मधील मौ. ईज्जतगाव (बु.) येथील 700.00 ब्रास असे एकुण 5004.98 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आले होते. या रेतीसाठ्याचा लिलाव 600 रुपये या दराने उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वा. ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात भाग घ्यावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय नायगांव (खै.) च्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराला १ जानेवारीपासून सुरुवात
नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या ३० वर्षांपासून एकाहून एक दर्जेदार आणि विक्रमी यश प्राप्त करणाऱ्या…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये
महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी नांदेड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र…
जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा
नांदेड :- जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत…