नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात मोठे अंतर्गत फेरबदल करण्यात आले असून पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार १६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत.

या आदेशानुसार १ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ६ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची विविध पोलीस ठाणे व विशेष पथकांमध्ये बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी व नवीन नेमणुकीची ठिकाणे:

पोलीस निरीक्षक:

  •  आनंद मुकुंदराव वागतकर: नियंत्रण कक्ष, नांदेड येथून शहर वाहतूक शाखा, इतवारा.

सहाय्यक पोलीस निरीक्षक:

  •  संगमेश्वर ईश्वर बिराजदार: नियंत्रण कक्ष, नांदेड येथून पोलीस स्टेशन, भोकर.
  •  राम हानमंत गिते: नियंत्रण कक्ष, नांदेड येथून पोलीस स्टेशन, अर्धापूर.
  •  कपिल केशवराव पाटील: नियंत्रण कक्ष, नांदेड येथून पोलीस स्टेशन, नांदेड ग्रामीण.

पोलीस उपनिरीक्षक:

चांदू मारोतीराव मुगळगावकर: पोलीस स्टेशन, हदगाव येथून विमानतळ सुरक्षा पथक.

गजानन व्यंकटराव तोटेवाड: पोलीस स्टेशन, नायगाव येथून वाचक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, देगलूर.

बाळासाहेब सदाशिव पापंटवार: पोलीस स्टेशन, सोनखेड येथून शहर वाहतूक शाखा, इतवारा.

संदीप वसंतराव देगलूरकर: पोलीस स्टेशन, बिलोली येथून पोलीस स्टेशन, नायगाव.

 संजय नन्गुराव मुंडे: नियंत्रण कक्ष येथून पोलीस स्टेशन, सोनखेड.

 संदीप सुरेश अनेबोईनवाड: नियंत्रण कक्ष येथून स्ट्रीट सेफ्टी पथक, नांदेड.

वजिराबाद पोलीस ठाण्यातील पदभरतीचा प्रश्न अनुत्तरित:

या फेरबदलांमध्ये नांदेड शहराचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या वजिराबाद पोलीस ठाण्याला एकही नवीन अधिकारी मिळालेला नाही. सध्या या ठिकाणी तीन अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर पदांच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे. एवढ्या कमी संख्याबळावर या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याचा कारभार कसा चालवला जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.तसेच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन वजिराबाद पोलीस ठाण्याच्या उपस्थित अधिकारी आणि पोलीस अमलदारांवर एव्हढा विश्वास ठेवतात की त्यांना मजूर मनुष्यबळा संख्ये प्रमाणे मनुष्यबळ देण्याची गरजच वाटत नसावी.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!