नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे हे दाखविण्यासाठी मन्याड खोऱ्यातील त्या शिक्षकाने विधानसभा निवडणुकीमध्ये 448 पत्रकारांचे पॅकेज मी फिक्स केले आणि मला साहेबांची मुलगी निवडूण आणण्याचा निवडणूकीचा अनुभव आहे. तेंव्हा पत्रकार संघाची निवडणुक माझ्यासाठी करंगळीचा खेळ आहे असे महाराष्ट्र संघाकडून आलेल्या निरिक्षकाला सांगितल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. याचा अर्थ असाच होतो की, लोकसभा, विधानसभा आणि आता नांदेड जिल्हा पत्रकार संघाची निवडणुक यामध्ये सुध्दा पैशांचा महापुर दिसणारच आहे.
लोकसभा, विधानसभाच्या निवडणुका अनेक कारणांनी गाजल्या. त्यामध्ये कोण-कोणाला कसे मॅनेज करतो हा विषय सुध्दा आहे. तसेच पैसे कोण जास्त वाटू शकतो हा ही विषय होता आणि तो अंमलात सुध्दा आला. पण पकडला कोणीच गेला नाही असो. त्यानंतर नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा कार्यकाळ संपला आणि आता निवडणुकीची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी राज्याचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एक निरिक्षक नांदेडला पाठविला होता. त्या निरिक्षकासमोर जिल्हा संघाची निवडणुक बिनविरोध व्हावी असे सादरीकरण काही ठरावीक लोकांनी केले हा त्यांचा विषय आहे. परंतू निरिक्षकांची सुध्दा ही जबाबदारी होती की, त्यांनी जिल्हा संघटनेत असलेल्या एकूण सर्व मतदारांना भेटणे आवश्यक होते. पण तसे सुध्दा काही घडले नाही. 1997 मध्ये बाबु रुद्रकंठवार यांनी ऑल इंडियाला जिल्हा संघाच्या निवडणुकीत धुळ चारली होती. त्यावेळेस जिल्हा संघाचे सदस्य फक्त 164 होते. त्या निवडणुकीनंतर बहुदा आजपर्यंत निवडणुक झालीच नाही. सर्व बिनविरोध वाटाघाटी सुरू आहे. पदे प्राप्त करून त्याचे व्हीजीटींग कार्ड तयार करणे आणि त्यांचा उपयोग प्रशासनिक अधिकाऱ्यांवर करणे हाच प्रकार सुरू आहे. जनता मात्र काही पत्रकारांना एक प्लेट आणि एक शिशी एवढ्याच पात्रतेची समजते. या पात्रतेला उच्च दर्जावर आणण्याचा प्रयत्न कोणत्याच पत्रकाराने कधी केलेला नाही.
गुडघ्याला बाशिंग बांधून यंदाच्या कार्यकाळात मलाच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व्हायचे आहे अशी वल्गना करणाऱ्या मन्याड खोऱ्यातील शिक्षकाने निरिक्षकाला असे सांगितले की, मी विधानसभा निवडणुकीमध्ये 448 पत्रकारांना पॅकेज वाटप केले आहे. म्हणजे ती 448 मते माझीच आहेत आणि मीच विजयी होणार. तसेच मला साहेबांच्या मुलीला निवडुण आणल्यामुळे मला निवडणुकीचा अनुभव आहे. अर्थात जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक माझ्यासाठी करंगळीचा खेळ आहे. शिक्षण विभागाला सुध्दा काही कळत नाही. कारण याच शिक्षकाने निवडणुक काळादरम्यान राजकीय पक्षांच्या दस्त्या आपल्या गळ्या घालून ,रॅलीत फिरल्याचे अनेक छायाचित्र उपलब्ध आहेत. कोणी तरी जागरुक नागरीक त्या छायाचित्रांचा उपयोग करील आणि शिक्षण विभागाकडे काही मागणीही करेल. ती मागणी पुर्ण झाली तर मन्याड खोऱ्याच्या या शिक्षकाची जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक लढविण्याचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिल.
गुजरातमध्ये देवाधी देव महादेव यांचे एक स्थान आहे. त्या स्थानाला कुबेर असे म्हणतात. कुबेर हे व्यक्तीमत्व आपल्या भक्तांना श्रीमंत करते अशी त्यांची ख्याती आहे. गेली 30-35 वर्ष अनेकांचे खिसे कापणारे पुन्हा एकदा अध्यक्ष बनण्याची इच्छा असणाऱ्याने कुबेरला नेण्याची सुरूवात केली आहे. सोबतच रंगीत पाण्याचा खेळ रंगलविला जात आहे. बघुय्या जिल्हा मराठी पत्रकार संघातील पत्रकार सदस्य चांगल्या माणसाला, संघटनेसाठी झटणाऱ्याला या निवडणुकीत निवडूण येतील एवढीच अपेक्षा आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी रंगतो आहे “रंगीत पाण्याचा खेळ’?
