नांदेड (प्रतिनिधी) – परभणी शहरातील संविधान प्रतिमेच्या अवमान घटनेचा खा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला आहे. याचबरोबर समाजकंटकावर कार्यवाहीची मागणी करत खा. चव्हाण यांनी सामाजिक शांततेचे आवाहन देखील केले आहे.
परभणी शहरात भारतीय संविधान प्रतिमेच्या अवमानाची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर खा. रविंद्र चव्हाण यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि अवमान देशविरोधी कृत्य असून हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावरती शासनाकडून कठोर कारवाई व्हावी. असे खा. चव्हाण यांनी समाज माध्यमातून म्हटले आहे. दरम्यान नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा राखावा असे आवाहन देखील खा. रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.