नवीन नांदेड(प्रतिनिधी)-हडको परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी 55 हजार 354 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
ए.डी.42 हडको या भागात राहणारे विठ्ठल तुळशीराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांचे घरफोडले. घरातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 55 हजार 354 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमंाक 1145/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शेख सत्तार हे करत आहेत.