नांदेड(प्रतिनिधी)-मौजे पिंपळगाव ता.धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दुसऱ्या एका घटनेत कुशवाडी ता.देगलूर येथे एका घरात बळजबरीने घुसून महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व पोत बळजबरी काढून घेण्याचा प्रकार घडला आहे.
पिंपळगाव येथील रमेश मारोती भोसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर ते 2 वाजेदरम्यान त्यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी फोडले. ते आपल्या कुटूंबियांसह नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. त्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. धर्माबाद पाोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 337/2024 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
कुशावाडी ता.देगलूर येथील रतनबाई माधवराव हिंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरात बालाजी दाऊ चंद्रे रा.कुशवाडी हा व्यक्ती आला आणि समईने त्यांना मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसुत्र असलेली पोत 40 हजार रुपये किंमतीची बळजबरीने हिसकावून नेली आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 557/2024 प्रमाणे दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.