नांदेड(प्रतिनिधी )- जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा,देव तेथेच जाणावा, मृदु सबाह्य नवनीत,तैसे सज्जनाचे चित्त.ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो ह्रदयी.दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी.तुका म्हणे सांगु किती,तोचि भगवंताची मूर्ती,संत तुकाराम महाराज यांच्या दोह्याची आज नांदेड शहरात प्रचिती आली. जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले उद्योजक सचिन कासलीवाल हे ब-याच दिवसांपासून रूग्णालयात आजारी होते. त्यांच्यावर संपुर्ण औषध उपचार प्रकिया करून आजारातून पूर्णपणे बरे झाल्याच्या नंतर आज दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी नवीन मोंढा नांदेड येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन पेढा भरवून आजारातून मुक्त झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला,
दिनांक 9 ऑगस्ट २०२४ रोजी क्रांती दिनी नांदेडमध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसंदर्भात बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने सकल दिव्यांग संघटनांना एकत्रित घेऊन आक्रोश मोर्चा व तिवृ स्वरूपाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी उद्योजक सचिन कासलीवाल यांच्या तर्फे जिल्हाभरातील दिव्यांगांना त्यांच्याकडून मदतीचा हाथ देऊन अन्नदान केले होते. त्यानंतर सचिन कासलीवाल हे आजारी पडुन रूग्णालयात दाखल होते. ते त्वरित बरे व्हावे यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सचिन कासलीवाल हे आता संपुर्ण आजारातून बरे झाले आहेत. त्याबद्दल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने त्यांना आज दिनांक ७ डिसेंबर रोजी नवीन मोंढा येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेऊन पेढा भरविला. यावेळी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार राहुल साळवे सह महानगराध्यक्ष राजु ईराबतीन आणि युवाजिल्हाध्यक्ष कार्तिक कुमार भरतीपुरम यांनी पेढा भरवून त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली असता उद्योजक कासलीवाल यांचे डोळे पाणावले.