नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर हा त्यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळपासूनच अभिवादनासाठी अनुयायांनी ठिक ठिकाणी गर्दी केली होती. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले. तर रात्री शहरातील अनेक भागातून पणतीज्योत रॅली काढून अभिवादन केले.
नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, अन्नदान वाटप, आरोग्य तपासणी शिबिर अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडशहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यांच्यासोबत प्रफुल्ल सावंत, कॉंगे्रसचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, अनिल मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, डॉ.विठ्ठल पावडे, महेश देशमुख, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम, धनंजय सुर्यवंशी, गणेश तादलापूरकर, लक्ष्मण भवरे, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, आंबेडकरी नेते रमेश सोनाळे, पत्रकार डॉ.गणेश जोशी, अनुराग पवळे, श्रीनिवास भोसले, सुरेश अंबटवार, सुर्यकुमार यन्नावार, शरद काटकर वंचितचे जिल्हाध्यक्ष आकाश जोंधळे, महानगराध्यक्ष राहुल सोनसळे, आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर शहरातील अनेक भागात रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो रक्तदात्यांनी नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान करून अभिवादन केले.