नांदेड(प्रतिनिधी)-पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंघ बादल आणि इतर सिख मंत्र्यांना श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार संत बाबा रघबिरसिंघजी यांनी भारतातल्या पाच तख्तांमध्ये त्यांनी उस्टी भांडी साफ करायची आहेत अशी शिक्षा दिली आहे. सुखबिरसिंघ बादल हे जखमी असल्याने त्यांना श्री दरबार साहिबच्या बाहेर बसण्यास सांगितले आहे.यामुळे सुखबिरसिंघ बादल बाहेर बसले आहेत.
आज दि.3 डिसेंबर रोजी सुखबिरसिंघ बादल आणि इतर अन्य आरोपी ज्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते सर्व 12 ते 1 वाजेपर्यंत दरबार साहिब येथील बाथरुमची सफाई करतील. सफाईनंतर स्नान करून लंगरमध्ये सेवा करतील. त्यानंतर आपल्या पश्चातापाचा भाग करून श्री सुखमनी साहिबचा पाठ करतील ही शिक्षा दोन दिवसांसाठी दिलेली आहे. अकाली सरकार असतांना डेरा सच्चासौदा सिरसाचे प्रमुख राम रहिम यांना माफी आणि बेअदबी या प्रकरणांमध्ये सुखबिरसिंघ बादल आणि इतर मंत्र्यांना शिक्षा देण्यात आली आहे.
विक्रम मजीठिया यांनी सांगितले की, सन 2007 ते 2012 पर्यंत ते कॅबिनेटमध्ये सदस्य नव्हते. पण सन 2012 ते 2017 मध्ये कॅबिनेटचे सदस्य होते. पण माझी काही चुक नाही तरी पण मी त्या कॅबिनेटचा भाग होतो म्हणून मी दोन्ही कर जोडून माफी मागतो. परमिंदरसिंघ ढिंढसा यांनी सांगितले की, मी सुध्दा हा गुन्हा केलेला आहे. त्यातील अकालीदलचे कार्यकारी प्रमुख बलविंदरसिंघ भुंदड यांनी आपल्या आरोपांवर नकार दिला.
राम रहिम विरुध्द तक्रार परत घेणे, त्यांना माफी देणे खोट्या प्रकरणांमध्ये मारल्या गेलेल्या सिखांना न्याय मिळाला नाही आणि संगत(सिख जनता) यांच्या पैशाने दिलेल्या जाहीरातील या कारणांसाठी त्यांना शिक्षा देण्यात आली आहे. श्री अकाल तख्त साहिबने दिवंगत मुख्यमंत्री प्रकाशसिंघ बादल यांना दिलेला फक्र-ए कौम ही उपाधी सुध्दा परत घेतली आहे.