नांदेड (प्रतिनिधी)- 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर भुमीवर जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी 4 आणि 5 डिसेंबर रोजी विशेष रेल्वे सोडाव्यात अशी मागणी करणारे पत्र रिपब्लिकन सेना नांदेडचे अध्यक्ष राजू सोनसळे यांनी केली आहे.
दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला होता. यासाठी राज्यभरातील नव्हे तर देशभरातील जनता 6 डिसेंबर रोजी मुंबई येथील दादर चैत्यभुमीवर येतात. त्यादिवशी लाखोंची संख्या भाविकांची असते. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद या मार्गावरून जाणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी असते. दरवर्षी रेल्वेमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता यंदा 4 आणि 5 डिसेंबर रोजी मुंबईकडे जाणाऱ्या किंबहुना दादरपर्यंत जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे गाड्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोडाव्यात अशी मागणी केली आहे. या अर्जाच्या प्रति राजू सोनसळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री नवी दिल्ली आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना सुद्धा अग्रेषीत केल्या आहेत.
One thought on “4 आणि 5 डिसेंबर रोजी दादरकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची मागणी”