नवीन नांदेड, (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 5 लाख 46 हजार रुपयांच्या चोरीला नांदेड ग्रामीण पोलिसांनी अत्यंत जलद गतीने उघडकीस आणून त्यात चोरी गेलेला संपूर्ण शंभर टक्के ऐवज जप्त केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत भगवान तुकाराम केंद्रे हे 76 वर्षीय शेतकरी राहणार गोळेगाव तालुका लोहा यांनी लातूर फाटा ते भगवान बाबा चौक असा ऑटोत दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रवास करत असताना त्यांच्यासोबत असलेल्या सह प्रवाशांनी त्यांची नजर चुकवून भगवान केंद्रे यांच्या बनियान मध्ये असलेल्या खिशात ठेवलेल्या प्लास्टिकच्या डब्यातील 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 2 लाख 73 हजार रुपयांचे, दोन सोन्याचे झुमके 10 ग्रॅम वजनाचे 78 हजार रुपये किमतीचे,कानातील वेल दोन नग 7 ग्रॅम वजनाचे 54 हजार 600 रुपये किमतीचे, सोन्याची अंगठी ऍड 78 हजार रुपये किमतीची, सोन्याची खड्याची अंगठी 7 ग्रॅम वजनाची 54 हजार 600 रुपयांची, सोन्याची नथ 1 ग्रॅम भजनाची किंमत 7800 रुपयांची असे एकूण 5 लाख 46 हजार रुपयांचे दागिने ऑटो चालक आणि इतर दोघांनी भगवान केंद्रेंना दिशाभूल करून चोरून नेले होते. याप्रकरणीचा गुन्हा 29 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता
नांदेड ग्रामीण पोलिसांनी आपले कसब वापरून या प्रकरणात शेख नुसरत शेख रशीद (42) रा. नवीन मुजामपेठ जिल्हा नांदेड तसेच अजिज खान अजमल खान (35) रा. नई आबादी दातार चौक तालुका जिल्हा नांदेड यांना पकडले. या दोघांनी मोहम्मद निसार मोहम्मद युसुफ राहणार नई शआबादी दातार चौक याच्या सह मिळून हा पाच लाख 46 हजारावर डल्ला मारला होता.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार विक्रम वाकडे, शेख सत्तार,संतोष जाधव,सुनील गटलेवार, माधव माने, शंकर माळगे, मारुती पचलिंग, ज्ञानेश्वर कलंदर आदींचे कौतुक केले आहे.