नरेंद्र मोदींच्या काळाता पत्रकारांना त्यांचे महिमा मंडन करण्याशिवाय पर्याय नाही
नांदेड-वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा ” कोठे की एक तवायफ़ और एक बिका हुआ पत्रकार एक ही श्रेणी में आते हैं असे शब्द वापरून अनेक बातम्या लिहिल्या आहेत. आज टी.व्ही.टुडे मध्ये काम करणारे राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक 2024 द ईलेक्शन सरप्राईज इंडिया यावर विश्लेषण करणारे एएए मिडीयाचे अजित अंजुम यांचे शब्द ऐकल्यानंतर आम्ही काही खोटे लिहित नव्हतो याचा आनंद झाला. या 1200 पानांच्या पुस्तकामध्ये मोदीला महामानव करणारे मिस्टर इंडिया हीरेन जोशी आहेत. हे स्पष्ट झाले. कशा पध्दतीने मोदीच सर्वात मोठे आहेत हे दाखविण्याची एक प्रक्रिया हिरेन जोशी हे 2008 पासून चालवित आहेत. देशातील कोणत्याही प्रसार माध्यमातील संपादक, मालक यांच्यात दम नाही की हिरेन जोशीबद्दल कोणी बोलेल. म्हणूनच अजित अंजुम म्हणतात. राजदीप सरदेसाई यांनी जोखीम घेतली आहे. तरी पण सत्तेसमोर नतमस्तक होवून त्यांचे भाट बनून दंडावत करण्यापेक्षा, आलोचनात्मक, आपल्या मर्जीनेच चालायचे यातच जास्त स्वाभिमान आहे.
सध्या बाजारात न आलेली एक पुस्तक 2024 द इलेक्शन सरप्राईज इंडिया ही अनेक टी.व्ही. माध्यमांमध्ये नामांकितपणे गाजलेल्या राजदिप सरदेसाई यांनी लिहिली आहे. यापुर्वी सुध्दा त्यांनी 2019 आणि 2014 च्या निवडणुकांवर पुस्तके लिहिलेली आहेत. पण 2024 च्या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिस्टर इंडिया म्हणजे कधीच कोठे न दिसणारे परंतू सर्व काम मोदीजींचे उत्कृष्टपणे करणारे हिरेन जोशी यांचा उल्लेख करून राजदिप सरदेसाई यांनी घेतलेली जोखीम वाखानण्यासारखी आहे. पीएमओ कार्यालयात बसतात ते हिरेन जोशी तिन संचिका बाळगतात. ज्यामध्ये एक हिरवी, एक लाल आणि एक पिवळ्या रंगाची आहे. यामध्ये त्यांच्या मर्जितील पत्रकारांची नावे हिरव्या संचिकेत, त्यांच्याविरुध्द असलेल्यांची लाल संचिकेत आणि कधी त्यांचे आणि कधी त्यांच्याविरुध्द असणारे पिवळ्या संचिकेत त्यांच्याकडे नमुद आहेत. ईलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झालेले हिरेन जोशी हे आज 54 वर्षाचे आहेत. सन 2008 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असतांना त्यांनी त्यांची भेट घेतली आणि मोदींचे मिडीया ऍडव्हाईजर झाले. 2008 पासून त्यांचे हे पद कोणीच काढू शकले नाही आणि त्यांचे कार्यालय पीएमओमध्ये आहे.
राजदिप सरदेसाईंच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, देशातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे मुख्यमंत्री, कोणताही मंत्री त्यांनी सांगितलेल्या शब्दांच्या पुढे जाण्याची हिम्मत राखत नाही. मोदी किती खास आहेत, किती मेहनती आहेत, त्यांच्या मनात देशासाठी किती चांगले विचार आहेत. हे दाखविणेच हिरेन जोशीचे काम आहे. कोणतेही चॅनल, वर्तमानपत्र त्यांच्याविरुध्द एक लाईन जरी बोलेल तर त्यांना हिरेन जोशी ज्या शब्दात शिव्या देतात त्या शब्दांचा उल्लेख न करता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते की, हिरेन जोशी तुम्ही केलेले कॉल अनेकांनी रेकॉर्ड केले आहेत, अनेकांनी व्हाटसऍपवर आलेले संदेश स्क्रिन शॉट करून ठेवलेले आहेत. कधी ते व्हायरल झाले तर तुम्हाला आणि मोदींना जगात तोंड दाखवता येणार नाही. प्रसार माध्यमांच्या प्रत्येक शब्दावर हिरेन जोशीची कडक नजर असते आणि ज्या पध्दतीने पत्रकाराने अथवा अँकरने बोलले आहे. त्या आधारावर लगेच हिरेन जोशी त्या प्रसार माध्यमाच्या मालकाला कॉल करून पत्रकारावर बंदी आणतात आणि ऍकरला ऑफ एअर करतात. एवढी त्यांची ताकत आहे.
कोणत्या ठिकाणी कोणत्या विषयावर मुलाखत द्यायची, ती मुलाखत महिला अँकर किंवा पुरूष अँकर घेणार, त्या मुलाखतीचे प्रश्न काय असतील या सर्वांची रेखाटनी हिरेन जोशी हे करतात. ती घेतलेली मुुलाखत कधी प्रसारीत करायची, कोणत्या कार्यक्रमात करायची हे सुध्दा जोशी ठरवतात. मोदींची मुलाखत प्रसिध्द झाल्यावर त्या संदर्भात विरोधी पध्दतीची कोणती ही मुलाखात छापायची नाही आणि दाखवायचीही नाही असा जोशींचा दंडक आहे. मोदींचे महामंडन करणारे पत्रकार, अँकर हे जोशीच्या हिरव्या संचिकेत नमुद आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कारण त्यांचे ऐकले नाही तर गुन्हे दाखल होणे, ईडी, सीबीआय आणि आयटीचा वापर होणे याला प्रसार माध्यमे सुध्दा भितात. मुलाखती पण मिळवायच्या आहेत. पैसे पण कमवायचे आहेत आणि आपला एवढा मोठा लवाजमा चालवायचा आहे यासाठी प्रसार माध्यमांकडे हिरेन जोशीचे ऐकण्याशिवाय कोणता पर्याय शिल्लक आहे. ऍर्नाल्ड हे इंग्लंडमधील पत्रकार सांगतात सत्तेच्या विरोधात लिहिणे हिच खरी पत्रकारीता आहे. त्याशिवाय पत्रकार जी कामे करतात त्याला संबंधांना टिकवणे असे म्हणतात.
राजदिप सरदेसाईच्या पुस्तकात मिडीया मॅनेजमेंट आजच होत आहे असे नाही. तर हरीश खरे, संजय बारु, पंकज पतोडी हे मनमोहनसिंघ पंतप्रधान असतांना त्यांचे मिडीया मॅनेजमेंट करायचे पण ते सर्व पत्रकार होते. पण आजच्या मिडीया मॅनेजमेंटमध्ये आज सुरू असलेली दांडगाई ही हिरेन जोशीमुळे आली असे लिहिले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांनी 10.5 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांनी एकदा अजित अंजुम यांच्या कार्यालयात गेले असतांना सांगितले होते की, दुसरा तु आहेस काय? ही बाब अजित अंजुम यांना कळालीच नाही. पण नंतर त्यांना कळाले की, आपल्या कार्यालयाच्या बाहेर माझ्या अगोदर त्यांची भेट माझे सहकारी विनोद कापडी यांच्याशी झाली आणि त्यांना पंतप्रधान म्हणाले होते की, माझ्याविरुध्द गरळ ओकणाऱ्यांमधला तु एक आहेस .त्यानंतर मला दुसरा असे म्हणाले होते. त्यानंतर आम्ही दोघांनीही काही दिवसातच टी.व्ही.9 मधीून राजीनामा दिला होता.
राजदिप सरदेसाईने लिहिलेल्या पुस्तकात डॉ.प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी माधुरी रॉय यांनी स्टार टी.व्ही. पासून सुरू केलेला आपला प्रवास एनडी टी.व्ही.पर्यंत आणला होता. हे सांगतांना उल्लेख केला आहे की, रॉय परिवार एकदा केनियाला जाण्यासाठी विमानतळावर गेले तेंव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना जाण्यास बंदी केली. प्रणव रॉयचा प्रश्न का याचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नव्हते. याच अधिकाऱ्यांमधील एक अधिकारी काही वर्षांनंतर एका विमान प्रवासात राजदीप सरदेसाई यांना भेटले होते. त्यांना त्या अधिकाऱ्याने सांगितले की, मी रॉय परिवारासोबत चुकीचेच करत होतो. परंतू माझ्याकडे काही पर्याय नव्हता. म्हणून मी उघडपणे आपल्या माध्यमातून रॉय परिवाराची माफी मागतो आहे. त्यानंतर रॉय परिवारावर 48 कोटीचा कर्ज घोटाळा, ईडी चौकशी, सीबीआय चौकशी लावण्यातज आली आणि अखेर त्यांनी एनडी टी.व्ही. अडाणीला विकले.एनडीटीव्ही सोबत केंद्र शासनाने केलेल्या व्यवहारावर एक पुस्तक लिहिला येईल एवढी मोठी त्या त्रासाची व्याप्ती आहे. जवळपास 8 वर्षानंतर आता सीबीआयने त्यांच्याविरुध्द काही पुरावा मिळाला नाही असे सागत त्यांच्या विरुध्दची संचिका बंद केली आहे. ईडीने केलेल्या चौकश्यांमध्ये अनेकांविरुध्द कोणताही भक्म पुरावा सापडलेलाच नाही हे सुध्दा सत्य आहे.
एकॉनॉमि टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात पंतप्रधान तर गेलेच नाहीत. पण कोणताही मंत्री पण गेला नाही. तो कार्यक्रम जागतिक दर्जाचा होता. त्या वृत्तमानपत्रात रोहिणी सिंह नावाच्या पत्रकार होत्या. पण त्यांनी मोदी विरुध्द लि हिलेल्या शब्दांमुळे नाराज झालेल्या हिरेन जोशीने ठरवले होते. म्हणजे हिरेन जोशी म्हणजे नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी म्हणजे हिरेन जोशी हे समिकरण स्पष्द्यट होते. त्या रोहिनीसिंहने काही दिवसानंतर राजीनामा दिला होता.
राजदिप सरदेसाई आणि बरखा दत्त यांनी गुजरात दंग्यांची ग्राऊंड रिर्पोटींग केली हेाती. त्यात 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. ही रिपोटींग केल्यावर राजदिप सरदेसाई आणि बरखा दत्त यांना झालेला त्रास या पुस्तकात लिहिलेला आहे. त्यावेळी राजदिप सरदेसाईला बरेच दिवस ऑफलाईन करण्यात आले आहेत.त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गुजरातला आले होते तेंव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना शिकवण दिली होती की, तुम्हाला राज धर्म पाळायला हवा. एका पत्रकारांने मोदींच्या जास्त लेकरांना जन्म देणे, तुमची संपत्ती हिरावली जाईल सांगणे, तुमच्या मुली पळवल्या जातील सांगितले. तुमचे मंगळसुत्र काढून घेतले जातील सांगणे या शब्दांवर त्याने निवडणुक आयोग पंतप्रधानांना का नोटी देत नाहीत असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या पत्रकाराला त्याच्या मालकाने पुर्ण लोकसभा निवडणुकीसाठी ऑफ लाईन केले होते. याचाही उल्लेख या पुस्तकात आहे.
पण आजच्या परिस्थितीत मोदी इमेज चांगल्यात चांगली तयार करणे हे काम पीएमओमध्ये बसून हिरेन जोशी करतात. पत्रकारांकडे त्याला पर्याय नाही. म्हणूनच अजित अंजूम सांगतात. की मी हिरेन जोशीच्या लाल रंगाच्या फाईलमध्येनमुद आहे याचा मला आनंद आहे. तरीपण अजित अंजूमला वाटते की, राजदिप सरदेसाईने सध्याच्या परिस्थितीत जोखीम घेतली आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा सत्याच्या मार्गावर चालतांना कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारच आहे आणि म्हणूनच 1950 च्या दशकातील स.आदत हसन मंटो यांच्या, ” कोठे की एक तवायफ़ और एक बिका हुआ पत्रकार एक ही श्रेणी में आते हैं। लेकिन इनमें तवायफ़ की इज़्ज़त ज्यादा होती है…।” या शब्दांवर आम्हाला पत्रकारांच्या त्या व्याख्येत जायचे नाही. यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असतो.
अजित अंजूमने राजदिप सरदेसाई यांच्या पुस्तकातील हिरेन जोशी या मोदींच्या मिस्टर इंडियावर बनवलेल्या व्हीडीओची लिंक आम्ही बातमीसोबत जोडली आहे.