नांदेड- वास्तव न्युज लाईव्हने सोमवारी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोटांचा पाऊस पडणार आहे असे वृत्त विश्लेषण प्रसारीत केले होते. काल मंगळवारी वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीनंतर प्रसिध्द राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उर्फ टायगर यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीने भारतीय जनता पार्टीला 3400 कोटी रुपये दिले असल्याचा खुलासा केला. आता यामुळे विरोधकांची काय परिस्थिती होईल हा विचार करण्याची गरज जनतेला आहे. जनतेने आपला मराठी बाणा कायम ठेवावा यासाठीच हे वृत्त विश्लेषण.
सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदार संघांमध्ये आजच्या परिस्थितीत प्रत्येक मतदानाला 4 हजार रुपये एवढा दर ठरला आहे. सर्वसाधारणपणे 70 हजार मतदान घेणारा उमेदवार निवडुण येतो. यामध्ये बहुरंगी लढती आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काही ठिकाणी 50 हजार मतदान मिळविणारा उमेदवार सुध्दा निवडुण येईल. या सर्व आकड्यांचा गुणाकार केला तर एका उमेदवाराला 3 ते 5 हजार कोटी रुपये मतदारांना द्यावे लागतील. निवडणुक आयोग याचा हिशोब कसा करील हे अवघडच आहे असो. म्हणतात ना प्रेम आणि युध्द यात सर्व काही बाबी कायदेशीर असतात. निवडणुकीचा दिवस येईपर्यंत मतदारांना मिळणाऱ्या पैशांचा आकडा वाढू पण शकतो.
वास्तव न्युज लाईव्हने सोमवारी यंदाच्या निवडणुकीत नोटांचा पाऊस पडणार आहे असे वृत्त विश्लेषण प्रसारीत केले होते. यावर काल मंगळवारी राज्यातील प्रसिध्द राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे उर्फ टायगर यांनी 3400 कोटी रुपये भारतीय जनता पार्टीला दिले आहेत. हा गौप्य स्फोट केला. त्यामुळे वास्तव न्युज लाईव्हने आकलीत केलेले विश्लेषण बरोबर आहे. यावर शिक्का मोर्तब झाला. याबाबीला प्रसिध्द वृत्तविश्लेषक अभिसार शर्मा यांनी आपल्या विश्लेषणातून दुजारा दिला. ज्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार हे सांगत होते की, 2019 च्या निवडणुकीच्या वेळेस शरद पवा, मी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मालक गौतम अडाणी सुध्दा हजर होते. आता प्रत्येक बाब, प्रत्येक शब्द लिहिता येईलच असे नसते.
वास्तव न्युज लाईव्हची वाचकांना विनंती आहे की, यंदाची विधानसभा निवडणुक ही तुमच्या मराठी बाण्याला पुराणी लावणारी आहे. या परिस्थितीत तुम्हाला मिळणारे पैसे हे महत्वाचे नसून तुमचा मराठी बाणा महत्वाचा आहे. आपल्या मराठी बाण्याची लाज आपण राखावी ही विनंती करण्यासाठीच हा शब्द प्रपंच.
-रामप्रसाद खंडेलवाल