नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे घरफोडून चोरट्यांनी 71 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरला आहे. शहरातील मगनपुरा भागात एका महिलेचे 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोरट्यांनी पळ काढला आहे. शहरातील पुष्पनगर भागात 16 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरल्याची तक्रार चोराच्या नावासह दाखल झाली आहे.
शेख खादीर शेख इसाक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 नोव्हेंबरच्या रात्री 11 ते 10 नोव्हेंबरच्या पहाटे 4 वाजेदरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पत्रावरून लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला आणि खुंटीला अडकवलेल्या पिशवीतील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 71 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 318/2024 नुसार नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रायबोळे हे करीत आहेत.
दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रंजना अंकुश शिंदे या महिला महादेव मंदिरात पुजा करून मगनपुरा भागातून पायी जात असतांना कोणी तरी दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण किंमत 70 हजार रुपयांचे तोडून पळून गेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 458/2024 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक किशोर गावंडे हे करीत आहेत.
शासकीय कंत्राटदार सतिश जीवनराव वाकोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पुष्पकनगर भागातून रुपेश अरविंद लोखंडे आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांच्या घराच्या टिनशेडमध्ये ठेवलेलेली गजाळी कापण्याची मशीन आणि लोखंडी रॉड किंमत 16 हजार रुपये असे साहित्य चोरुन नेले आहे.भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 567/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
हदगावमध्ये घरफोडले, शहरातील मगनपुरा भागात महिलेचे गंठण तोडले; बांधकाम साहित्याची चोरी
