मोहन हंबर्डेंच्या मते लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार 2 लाखांनी निवडूण येईल

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा नांदेड दक्षीणमधील कॉंगे्रस पक्षाचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी या निवडणुकीत लोकसभेचा भाजप उमेदवार 2 लाखांच्या मताधिक्याने निवडूण येईल असे वक्तव्य केल्यानंतर त्याची बरीच चर्चा होत आहे. त्या वक्तव्याला सावरण्याचा सुध्दा प्रयत्न झाला. पण विरोधकांच्या हाती लागलेले हे कोलीत विरोधक वापरणाच.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक आणि नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा निवडणुकीसह लोकसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नांदेड दक्षीण या विधानसभा मतदार संघातील आमदार असलेले मोहन हंबर्डे यांना कॉंगे्रस पक्षाने आपली उमेदवारी दिली आहे. तर लोकसभा पोट निवडणुकीमध्ये मोहन हंबर्डे यांचे बंधून संतुक हंबर्डे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. यासंदर्भाने आप-आपला प्रचार दोन्ही बंधू करत आहेत. यांचे काही बंधू दोन्हीकडून आहेत. त्यांच्यासाठी पक्ष महत्वाचा नाही तर त्यांची भावकी महत्वाची आहे. म्हणजे पुन्हा एकदा जातीचा विषय आलाच. भारतीय संविधानाने जात हा शब्दच संपविला होता. परंतू दुर्देवाने आजही 77 वर्षानंतर सुध्दा जातीच्या उल्लेखाशिवाय राजकीय पाऊले उचलली जात नाहीत हेही तेवढेच सत्य आहे.
काल एके ठिकाणी बोलतांना मोहन हंबर्डे यांनी मागील निवडणुकीमध्ये जनतेने 40 हजारांचे मताधिक्य दिले होते. यंदा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य देवून जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्र्वास व्यक्त केला. मुळात त्यांना कॉंगे्रसच म्हणायचे असेल परंतू बोलता-बोलता तोंडून निघालेला शब्द कॉंगे्रस ऐवजी भाजप झाला आाणि त्यामुळे मोहन हंबर्डे यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्यानंतर या प्रकरणाची सारवा सारव सुध्दा करण्याचा प्रयत्न झाला. परंतू विरोधकांच्या हाती लागलेल्या मोफतच्या कोलीताचा व्हिडीओ विरोधक करणार नाही काय?. करतीलच आता याचे उत्तर निवडणुक प्रचार संपेपर्यंत देता-देता मोहन हंबर्डे यांच्या नाकी नऊ येतील असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
हा भाग मोहन हंबर्डे यांनी बोललेल्या शब्दांमुळे तयार झाला. पण विष्णुपूरी या गावात तर ही चर्चा खुले आम सुरू आहे की, वर कमळ आणि खाली पंजा अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये कमळ म्हणजे संतुक हंबर्डे आणि खाली पंजा म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मोहन हंबर्डे यांना निवडुण आणायचे आहे असा त्या चर्चेतला मतितार्थ आहे.
या बातमीसोबत मोहन हंबर्डे यांचा व्हिडीओ जोडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!