महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला लुटून नेणारे निर्लज्जपणे मते मागत आहेत हे योग्य नाही-उद्धव ठाकरे

लोहा,(प्रतिनिधी)- गद्दारी करणाऱ्यांना मुळासकट उकडून टाका असे सांगून राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागला तर हात काढून टाकल्या जाईल असे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलांना तीन हजार रुपये महिना या सहित महिलांची सुरक्षा,कपडे, निवारा तसेच स्वतंत्र पोलिस ठाणे महिलांसाठी निर्माण करण्यात येतील असे सांगून मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल राज्यातील उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्यांना हद्दपार करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोहा येथील जाहीर सभेत केले.
        लोहा कंधार मतदार संघातील शिवसेना उबाठा गटाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार एकनाथ  पवार यांच्या प्रचारार्थ बैल बाजार येथे आज दि.(०९) नोव्हेंबर रोजी दुपारी १.२३ वाजता उद्धव ठाकरे यांनी भाषणात प्रारंभ करून २३ मिनिटाच्या भाषणात त्यांनी शिवसेना कोणी चोरली या सहित माझ्या वडिलांचे फोटो चोरले आणि एकनाथ दादा पवार यांची बनावट नाव पुढे आले आहे असेही करून असे साध्य होणार नाही असे सांगत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे म्हणाले की राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. आमच्या शिवसैनिकावर भर दिवसा हल्ला होत आहे. बोटे छाटली जात आहेत जशास तसे उत्तर देण्यात येईल असे सांगत ठाकरे यांनी राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पाठविणाऱ्याचा हिशोब करा असे त्यांनी जाहीर सभेत सांगितले.
     यावेळी व्यासपीठावर मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे,खा.डॉ.शिवाजीराव काळगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, मुक्तेश्वर धोंडगे,उमेदवार एकनाथ दादा पवार, दत्ताभाऊ शेंबाळे,रंगनाथराव भुजबळ, नवनाथ बापू चव्हाण ,संजय भोसीकर, शरद पवार, बालाजी पांडागळे, प्रभाकर पवार, सोनू संगेवार, संगीता डक,जनाबाई नाकाडे, भाऊसाहेब कदम,सुरेश हिलाल, संजय ढाले,सविता सातेगावे, आयोध्या पौळ,खंडू पवार, गजानन मोरे आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी माजी आमदार रोहिदास चव्हाण, बबनराव थोरात,एकनाथ दादा पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.
       यावेळी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, गद्दार चिखलीकरांना त्यांची जागा दाखवून द्या असे भर सभेत आवाहन करत आमची सत्ता आल्यास महिलांना तीन हजार रुपये देणार, महिला पोलीस स्टेशन नेमणार असे सांगून सध्याचे सरकार हे महाराष्ट्र द्रोही लुटारू सरकार आहे. बटेंगे तो कटेंगे असे यांचे कार्य चालू आहे आणि राजकारणातील निवडणुकीत कापणार असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती महिला सुरक्षा रोजगार निवारा निवारा वस्त्र यासाठी जनतेच्या न्यायालयात मी आलो असल्याचे प्रतिपादन केले. सर्व जनतेने मतदारसंघाचा विकास करू असे आव्हान त्यांनी 23 मिनिटाच्या भाषणात केले. या भाषणात त्यांनी चिखलीकरांवर सडकून टीका केली.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम कदम यांनी तर आभार संजय भोसीकर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!