दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुदा गरीबच असतात अगरबत्ती पेट घेताच सुगंध देते असं नाही काही वेळ जाऊ द्यावा लागतो नंतर तिच्या अस्तित्वाचा गंध प्रखरतेने जाणवण्यास सुरुवात होते मनात विचारांची साखळी असली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो पण मनात नुसती ओढ असली की तो रस्ता संपता संपत नाही डोळे कितीही छोटे असले तरीही एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी ॠणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात तर ती आठवणींच्या सुगंधाने नेहमी बहरलेली असतात कोणत्याही नात्यात प्रामाणिक असणारेच गुंतले जातात वेळ घालवणारे गोड बोलून निघून जाता नात जपायचं आणि प्रेम मिळवायच असेल तर लहान सहान गोष्टींचा इश्यू करायचा नसतो कोणी सुखात समाधान शोधते तर कोणी समाधानात सुख पण सत्यता एवढीच की सुखाने कोणीच समाधानी होत नाही आणि समाधानात कोणीच सुखी राहत नाही त्यामुळे हा सुख समाधानाचा शोध निरंतर शोधतच राहतो पण हा शोध थांबवणं ही गरजेचं असत आयुष्याच्या एक वळणावर तेव्हा एकासाठी एकाचा त्याग करावाच लागतो आणि तेव्हा होतो माणूस खऱ्या अर्थाने सुखी समाधानी माणूस मुहूर्ताविना जन्म घेतो आणि मुहूर्ताविना जग सोडून जातो तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो.मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असूच शकत नाही जेव्हा स्वभावाची बेरीज चूकायला लागते तेंव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वःतावर पूर्ण विश्वास आहे आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जा कारण तो पुन्हा मिळवण्यासाठी येथे वन्स मोर नसतो ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे परंतु कुटुंब नातीगोती आणि मित्र परिवार हे जीवनाचे मुळ आहे आपण एक वेळ फळाशिवाय राहू शकतो पण मुळाशिवाय उभे नाही राहू शकत कारण मुळ कुजले की मोठे मोठे वृक्षही उन्मळून पडतात त्यासाठी कुटुंब नातीगोती मित्रपरिवार ही मुळे जपा कठीण प्रसंगी तीच कामी येतात जे बोलतो ते शब्द असतात जे बोलता येत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही त्या मर्यादा असतात परिस्थिती कशीही असो दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य स्वभाव असा असावा की सहवासाची जाणीव नाही झाली तरी पण दुराव्यात उणीव भासली पाहिजे आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा सामानाचे ओझे अशा ठिकाणी ठेवावे जिथे ते सुरक्षित राहील आणि मनातील सुख दु:खाचे ओझे अशा ठिकाणी मोकळे करावे तिथून ते कुठे जाणार नाही देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान होण्यासाठी सद्गुरु पाहिजे सद्गुरु मिळण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्य मिळण्यासाठी पुण्य पाहिजे आणि पुण्य मिळण्यासाठी सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे तुम्ही कितीही चांगले रहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टिकोनाचे नाही स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल मैत्री अशी करा की जग आपलं होईल अपयश असं स्विकारा की विजेता भारावेल माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल कोणतीही गोष्ट असो बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात म्हणून नात्यात संवाद साधणे खूप गरजेचे त्यामुळे एकमेकांच्या समस्या अडचणी सुख दुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील व नाते अजून घट्ट बनतील सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हांला माणूस बनवते अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो मनातून उतरणे आणि मनामध्ये उतरणे हे आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलतां आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल आपण स्वतःशी वाद घातला तर ऊत्तरे सापडतील दुसऱ्याशी वाद घालत बसलो तर असंख्य प्रश्न निर्माण होतील म्हणून स्वतःशीच बोला व आनंदात रहा दिखावा आणि देखावा यातला फरक कळला ना की आयुष्यात येणारी माणसं ओळखणं सोप्पं जात जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते*✍️
*विचारधन परिवर्तन*
-ॲड.कैलास विश्वनाथ पठारे पाटील,
*अध्यक्ष महाराष्ट्र राज्य: लिगल विंग A I J.*