नांदेड(प्रतिनिधी)-कासारखेडा गावाच्या एका शेतात बसलेल्या डावातील मंडळी काम करणाऱ्या महिलांकडे बघून लघुशंका करत असतांना झालेल्या वादानंतर अर्धापूर पोलीसांनी याबद्दल शेतातून दुचाकी का नेली असे कारण नमुद करून घेवून अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणाचे व्हिडीओ रेकॉंर्डींग वेगळेच सांगते आहे.
कासारखेडा गावातील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 29 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेता लगत असलेल्या दुसऱ्या शेतात एक डाव सुरू होता. त्यातील मंडळी महिलेच्या शेताकडे बघून लघुशंका करत असतांना त्यांनी यावर आक्षेप घेतला की, आम्ही महिला इकडे काम करत असतांना असे करणे योग्य नाही. तेंव्हा झालेल्या चर्चेचा व्हिडीओ उलब्ध आहे. त्यात ती महिला आमच्याकडे पाहुन तुम्ही हे करता असे म्हणत आहे. त्यातील एक माणुस सांगतो की, डाव बंद करावा काय. हा डाव कशाचा असतो हे लिहिण्याची काही गरज आम्हाला वाटत नाही.कारण ते सर्वांना माहित आहे.पण पोलीसांनी एनसी दाखल करतांना शेतातून दुचाकी नेण्याच्या कारणावरून वाद झाला असे नमुद केले आहे. यात भारतीय न्याय संहितेची कलमे 352,351(2) आणि 3(5) नमुद करण्यात आली आहेत. याप्रकरणात आरोपी सदरात दोन जणांची नावे नमुद आहेत.