नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने शहराच्या चारही बाजूने नाका बंदी पथक तैनात करण्यात आले आहेत. यातच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपासणी पथकाकडून एका गाडीची तपासणी करत असतांना त्यांच्याकडे 1 कोटी 5 लाख रुपयांची रक्कम बिनहिशोबी आढळून आल्याने त्यांच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ही रक्कम ताब्यात घेवून पुढील कार्यवाही सुरु केली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने निवडणुक विभागा आणि पोलीस विभागाकडून प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. यातच जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या वाहनांवर विशेष पथकांकडून तपासणी केली जात आहे. अशातच नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील व भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणुक विभागाच्या पथकाकडून गाडी क्रमांक एम.एच.12 टी.व्ही.4016 या ही गाडी मालेगावकडे जात असतांना तपासणी केली असता या गाडीत 1 कोटी 5 लाख रुपये आढळून आले. ही गाडी बॅंकेची असून ही रक्कमही बॅंकेची आहे अशी प्राथमिक माहिती तपासणी करत असतांना गाडीतील लोकांनी दिली असली तरी परंतू निवडणुकीचा काळ असल्यामुळे रक्कम किती वापरावी आणि काय नाही या बाबतच्या सर्व सुचना दिल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम तुमच्या गाडीत आहे याचा पुरावा काय अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही पुरावा मिळाला नाही. यामुळे भाग्यनगर पोलीसांनी ही गाडी ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठीची प्रक्रिया पुर्ण करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.