उस्माननगर-येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक (कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या.
सायंकाळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन. नातवंड असा परिवार आहे. वजीराबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शरद सोनटक्के यांच्या आत्या होत.