नांदेड (प्रतिनिधी)-महावितरण कंपनीची परिक्षा देणाऱ्या मुळ विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर स्वत: चे फोटो लावून डमी विद्यार्थी परिक्षा देत असतांना त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
24 ऑक्टोबर रोजी महावितरण कंपनीच्यावतीने परिक्षा घेण्याची जबाबदारी टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस एक्झाम कंडक्टींग कंपनीच्यावतीने घेण्यात येत होती. ही परिक्षा विष्णुपूरी येथे सुरू असतांना रोल क्रमांक 1940000873 हे हॉल तिकिट श्रीकांत श्रीनिवास सानप यांचे होते. त्यावर अर्जुनसिंह चुडाराम राजपूत (24) रा.संजर कुराडी औरंगाबाद यांने स्वत:चा फोटो लावून डमी परिक्षा देत होता. या संदर्भाने अजय सतिश लुंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 319(2) आणि महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड परिक्षा अधिनियमातील कलम 7 आणि 8 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 962/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार सातारे यांच्याकडे देण्यात आला आहे .