नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे आज मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास एका चार चा की वाहनात 12 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत. पण त्या रक्कमेचा निवडणुकीशी संबंध आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही. पोलीसांनी या बाबत आयकर विभागाला तपासणी करण्याचे सुचविले आहे.
आज मध्यरात्री 1 वाजेच्यासुमारास एम.एच.20 सी.एच.4334 ही चार चाकी गाडी हिमायतनगर येथून भैसा(तेलंगणा) कडे जात असतांना एसएसटी पॉईंट पाळज येथे कार्यरत पोलीस अंमलदार जेकुट, राठोड, केंद्र प्रमुख ग्रामपंचायत अधिकारी यु.व्ही.केंद्रे, एम.एन.शेख, बी.डी.कनोजवार हे वाहनांची तपासणी करत असतांना या गाडीमध्ये पाठीमागील सीटच्या पायदानाजवळ नायलॉन पोत्याची तपासणी केली असता त्यात 12 लाख 50 हजार रुपये होते. एसएसटी पथकाने याचा पंचनामा तयार केला आहे. या गाडीमध्ये विजय बाबु चव्हाण (42) रा.कांचली ता.किनवट, सुरेश सर्जेराव मोरेे रा.छत्रपती संभाजीनगर, संतोष काशीनाथ अंभोरे(41) रा.पेडगाव ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर असे तिन व्यक्ती आहेत. पोलीसांनी या रक्कमेची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पैसे कोणाचे आहेत, कोणाकडे जात होते याबद्दलचा तपास सुरू आहे.