नांदेड(प्रतिनिधी)-14 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांविरुध्द भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. आजच्या परिस्थितीत समाज माध्यमे, कायदा आणि संस्कृती मरण पावलेली नसतांना सुध्दा असे दुर्देवी प्रसंग घडतात. याच भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 5 वर्षीय अल्पवयीन बालिकेच्या प्रकरणात न्यायालयाने एका वर्षात निकाल दिला आणि पत्रकारांनी त्या बालिकेच्या नावासह आई-वडीलांच्या फोटोसह ती बातमी प्रसिध्द केली या पेक्षा या लोकशाहीचे दुर्देव असूच शकत नाही.
एका 14 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेने भोकर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती दहावी वर्गात शिक्षण घेते. त्यांच्या मालकीचे शेत दोन व्यक्तीने बटाईने घेतले. त्यांची नावे सुदर्शन राजू जंगेवाड आणि निखिल माधव चंदापुरे अशी आहेत. दि. 16 ऑक्टोबर 2024 रोजी मी माझ्या शाळेतील परिक्षा देवून मी आणि माझी चुलत बहिण घरी येत असतांना दुपारी 12 वाजेच्यासुमारास ऍटोमधून उतरून घरी पायी जात असतांना एका गाडीमध्ये सुदर्शन राजू जंगेवाड आणि त्याचा मित्र निखील माधव चंदापुरे हे दोघे आले आणि त्यांनी माझे तोंड दाबून त्या वाहनात ढकलले. पुढे त्यांनी एका देवाधी देव महादेव मंदिरासमोर एका ठिकाणी ती गाडी थांबवून गाडीमध्येच मला आडवे पाडून माझ्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्याने अर्थाने निखीलने पाण्याच्या टाकीजवळ नेऊन माझ्यावर जबरीने अत्याचार केला. सोबतच माझ्या वडीलांना बोलावून मला त्यांच्या हवाली केले. त्यानंतर मी तक्रार देत आहे. त्यानुसार भोकर पोलीसांनी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांविरुध्द 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.35 वाजता गुन्हा क्रमांक 396/2024 दाखल केला. त्यामध्ये भारतीय न्याय संहितेची कलमे 64(2)(एम), 65(1), 137(2), 49, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6 आणि 17 ही कलमे जोडलेली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.