नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून चोरी प्रकरणातील 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक बालाजी मस्के, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, शेख जावेद, रितेश कुलथे, राजेश माने, शेख शोयब, ज्ञानेश्र्वर भिसे, हरप्रतिसिंघ सुखई, नागनाथ स्वामी आदींनी जिजाऊनगर गुरूकृपा दुध डेअरी समोर दि.13 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता एका विद्यार्थ्याची दुचाकी गाडी थांबवून त्याच्या गळ्यातील 14 ग्रॅम सोन्याची चैन 70 हजार रुपये किंमतीची दुचाकीवर पळून गेलेल्या दोघांना पकडले. या घटनेचा गुन्हा क्रमांक 421/2024 आहे. या प्रकरणाचा तपास करतांना उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज आणि आपल्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विमानतळ पोलीसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडले. त्यांच्याकडून 13 ऑक्टोबर रोजी लुटलेली सोन्याची चैन 70 हजार रुपये किंमतीची, दोन मोबाईल 40 हजार रुपये किंमतीचे आणि दुचाकी गाडी 20 हजार रुपये किंमतीची असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी विमानतळ पोलीसांचे कौतुक केले आहे.