नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस उपनिरिक्षक यांचे खांदेपालट

नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या अगोदर नांदेड जिल्ह्यात तीन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस उपनिरिक्षक यांना पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड ग्रामीणचे नागनाथ आयलाने यांना लोहा येथे पाठविले आहे.
आज विधानसभा निवडणुक जाहीर झाली म्हणजेच आचार संहिता पण लागू झाली. त्या अगोदरच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस निरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पाच पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.
नांदेडच्या नियंत्रण कक्षात असलेले पोलीस निरिक्षक नागनाथ शंकर आयलाने यांना लोहा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. वैजनाथ किशनराव मुंडे यांना उमरी पोलीस ठाण्याचे प्रभारी केले आहे. महेश सजनमाळी यांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरिक्षक पदावर पाठविण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक शहादेव बाबासाहेब खेडकर यांना मुदखेड पोलीस ठाण्यात पाठविले आहे. संतोष शामराव सानप यांना वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. विठ्ठल हनुमंत घोगरे यांना स्थानिक गुन्हा शाखेतील खंडणी विरोधी पथकात नियुक्ती दिली आहे. हदगाव येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश एकनाथ मांटे यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलविले आहे. आर्थिक गुन्हा शाखेतील विलास सुदाम गवळी यांना पोलीस ठाणे शिवाजीनगरमध्ये नियुक्ती दिली आहे.
नांदेडच्या नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक अश्विनी चंद्रहार गायकवाड यांना देगलूर पोलीस ठाण्यात पाठविले आहे. रवि निवृत्ती घोडके यांना हिमायतनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. रावसाहेब सिद्राराम चव्हाण यांना मुखेड पोलीस ठाण्यात पाठविले आहे. अमोल प्रल्हादराव इंगोले यांना कंधार पोलीस ठाण्यात पाठविले आहे. दहशतवाद विरोधी पथकातील संदीप व्यंकटराव भोसले यांना पाोलीस उपअधिक्षक इतवारा उपविभागात वाचक पदावर नियुक्ती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!