नांदेड – येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच वर्षाची सेवाकाळ पूर्ण केलेल्या सर्व पोलिस अमलदारांची तात्काळ बदली करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या नांदेड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या तर काही पोलीस अधिकाऱ्यांना नांदेड परिक्षेत्राच्या बाहेर पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या पाच वर्षापासून अनेक अंमलदार कार्यरत आहेत . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या सर्व अंमलदारांची तातडीने बदली करण्यात यावी कारण गेल्या पाच वर्षापासून याच ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिसमीलदारांमुळे येत्या विधानसभा निवडणुकीवर त्यांचा प्रभाव पाडण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस आमदार यांची तात्काळ बदली करावी अशा मागणीची निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,895 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छातीत कळ आली अन्…; नांदेडमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू अडचणी कमी झाल्या, आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्या…