नांदेड(प्रतिनिधी)-एका विशेष पथकाने अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याऐवजी त्यांच्याकडूनच मलिदा खाण्याचा प्रकार समोर येताच पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 6 नवीन पथके तयार केली आहेत. या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता तरी धडा घेण्याची गरज आहे. हा धडा फक्त नांदेडसाठी नसून नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चारही जिल्ह्यांसाठी आहे.
11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यातील 6 विशेष पथकांमधील एका पथकाने शहाजी उमाप यांनी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्फत दाखविलेला विश्र्वास दरीत फेकुन दिल्यानंतर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जुनी सर्व पथके निरस्त करून नवीन सहा पथकांची स्थापना केली आहे.
पथक क्रमांक 1- उपविभाग नांदेड शहर- सहाय्यक पोलीस निरिक्षक गंगाधर गायकवाड, पोलीस अंमलदार नंदु पवार, वच्चेवार, तुकाराम खंडू तुरटवार, मल्लिकार्जून बळीराम पचलिंगे असे आहेत.
पथक क्रमांक 2- उपविभाग इतवारा-पोलीस उपनिरिक्षक गजानन कागणे, पोलीस अंमलदार बंडू कलंदर, दिलीप गुट्टे, संजय यमलवार, नवनाथ गुट्टे असे आहे.
पथक क्रमंाक 3- उपविभाग नांदेड ग्रामीण व भोकर- सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस अंमलदार कृष्णा सुनोडे, किर्तीकिरण उत्तम डोईबळे, उध्दव शंकरराव सावंत, रविकुमार गंगाधर कांबळे असे आहे.
पथक क्रमांक 4- उपविभाग किनवट व माहुर- पोलीस उपनिरिक्षक पालसिंग ब्राम्हणे, पोलीस अंमलदार नामदेव रोहिदास इनकर, सोमनाथ किशनराव देशमुख, मिर्झा नवीद बेग मिर्झा वाहिद बेग, नुरखान महेबुब खान पठाण असे आहे.
पथक क्रमांक 5-उपविभाग धर्माबाद व बिलोली-सहाय्यक पोलीस निरिक्षक सहदेव खेडकर, पोलीस अंमलदार अमरसिंह रामसिंह दखने, अक्षय साईनाथ आचेवाड, राजू चंद्रकांत जायभाये, सय्यद सलीमोद्दीन सय्यद मैनोद्दीन असे आहे.
पथक क्रमांक 6- उपविभाग कंधार व देगलूर- सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.एस.आरसेवार, सचिन मारोती राठोड, शिवाजी शंकर आडंबे, ब्रम्हानंद रावसाहेब केंद्रे, जमीर खान मुनिर खान असे आहे.
या सर्वांना पुढील आदेशापर्यंत अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याची जबाबदारी दिली आहे. या पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे फोन नंबर सुध्दा प्रसिध्दीसाठी दिली आहेत. वाचकांच्यासोयीसाठी आम्ही ती पीडीएफ संचिका बातमीसह जोडली आहे. ज्यामध्ये जनता या सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदारांचे फोन नंबर पाहुन त्यांना अवैध धंद्यांबाबत माहिती देवू शकेल.