बोरगावचे सेवानिवृत्त शिक्षक मारोती उत्तरवार यांना निरोप
नांदेड.(प्रतिनिधी) – दक्षिण विभागातील शेवडी बाजीराव या केंद्राची अध्ययन स्तर निश्चिती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर यांची उपस्थिती होती तर यावेळी मुख्याध्यापक आनंदा नरवाडे, माजी केंद्रप्रमुख नागोराव जाधव, प्रा. शा. बोरगावचे मुख्याध्यापक मारोती उत्तरवार, पदोन्नत मुख्याध्यापक सोनटक्के बी. एन. प्रा. शा. धनगरवाडी, पदोन्नत मुख्याध्यापक अशोक राऊत सर प्रा शा दगडगाव, पदोन्नत मुख्याध्यापक विजय राणे प्राशा बेटसांगवी क्र १, सर्वजित धुतराज आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करून झाली. सर्वप्रथम वेध प्रेरिका सौ राठोड बी.एम. प्रा.शा. भेंडेगाव यांनी उपस्थित त्यांना अध्ययन स्तर निश्चिती विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या स्वागतानंतर सेवानिवृत्तीबद्दल निरोपमूर्ती उत्तरवार एम.पी. यांचे सर्व केंद्रातर्फे ड्रेस, साडी व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यानंतर नागोराव जाधव माजी केंद्रप्रमुख शेवडी बा यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सहशिक्षक मोरे डी. यु. व कोल्हे आर. बी. व राठोड बी.एम. यांनी सत्कारमूर्ती व निरोप मूर्ती यांच्या सहवासाबद्दल आठवणींनाा उजाळा दिला. अध्यक्षीय समारोपात अंबुलगेकर यांनी मारोती उत्तरवार आणि नागोराव जाधव यांच्या कार्याचा गौरवास्पद आढावा घेऊन उपस्थितांना प्रशासकीय सूचना देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम एच. एच. यांनी केले. तर आभार खडकमांजरीचे मुख्याध्यापक त्र्यंबक राऊत यांनी मानले. सुरुची भोजनाची व्यवस्था प्रा. शा. खडकमांजरीचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व मुख्याध्यापक व सर्व अंतर्गत शिक्षक बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.