नांदेडला नुकसानग्रस्तासाठी 812 कोटींची मागणी

  • अतिवृष्टीचा सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका
  • अतिवृष्टीमुळे 5 लाख 96 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नांदेड दि. 4 ऑक्टोबर : नांदेड जिल्‍हयात एक ते तीन सप्‍टेंबर 2024 या  कालावधीत 62 मंडळात अतिवृष्‍टी होवून शेतीपीक व शेतजमीन नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अहवाल प्राप्‍त झाला. त्‍यानुसार नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्‍यात आला आहे. जिल्‍हा प्रशासनाकडून ग्रामस्‍तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे करण्‍यात आले. राज्‍य शासनाकडून प्राप्‍त मान्‍यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे  दर  वाढविण्‍यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा 2 हेक्‍टरवरून 3 हेक्टरपर्यंत करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ग्रामस्‍तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्‍त पंचनामे पुर्ण झाले आहेत व निधी मागणी विभागीय आयुक्‍त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सादर केली आहे.

तालुका बाधित शेतकरी संख्या , एकूण बाधित क्षेत्र (हे.आर.), अपेक्षीत निधी (रक्कम कोटीत) पुढीलप्रमाणे आहे.

नांदेड बाधित शेतकरी 34641 व बाधित क्षेत्र 21752 अपेक्षित निधी 29.85 कोटी रुपये, अर्धापूर -32448, 24245, 32.97, कंधार- 73650, 52402, 71.27, लोहा -80840, 61642, 84.40, बिलोली- 36099, 34169, 46.47, नायगांव- 56172, 41645, 56.64, देगलूर- 61123, 37462, 50.95, मुखेड- 79603, 41114, 55.92, धर्माबाद- 28795, 20042, 27.26, उमरी- 34038, 24042, 32.70, भोकर- 43059, 38308, 52.19, मुदखेड- 30812, 21584, 29.35, हदगांव- 74228, 60492, 82.27, हिमायतनगर- 34533, 32805, 44.61, किनवट- 57702, 59132.78, 80.42, माहूर- 26172, 25681.18, 35.12 असे एकूण 783915 बाधित शेतकरी आहे तर बाधित क्षेत्र हे.आर 596517.96 इतके आहे यासाठी अपेक्षित रुपये 812.386 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!