नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप एकीकडे काल 2 ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गाव योजनेचे उद्घाटन करत होते. तर दुसरीकडे पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्ष क्रमांक 11 मध्ये गुटख्याच्या प्रकरणात अत्यंत समृध्द असलेल्या डॉक्टरने गुटखावाल्यांसोबत एक मिटींग आयोजित केली. याची चर्चा पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर आली आहे. त्या ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्यांचे फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद होतच असते.यालाच म्हणायची असते हिंम्मत.
काल 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी शिवूर गावात व्यवसनमुक्त गाव या योजनेचे उद्घाटन केले आणि आपल्या परीने परंपरागत पोलीसींग सोडून समाजासाठी काय करता येईल यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. महाराष्ट्र सरकारने गुटखा हा पदार्थ प्रतिबंधीत केलेला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यांपैकी एक वगळता तीन जिल्ह्यांमध्ये शहाजी उमाप यांच्या आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसते आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पान टपरी चालकांनी बंद झालेल्या पानपट्टीवर पान टपरी विकायची आहे असे बोर्ड लावले आहेत. एकीकडे ही सर्व तयारी सुरू असतांना दुसरीकडे मात्र भयंकर प्रकार सुरू आहे. यावर सुध्दा शहाजी उमाप यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
त्याची हकीकत अशी आहे की, काल दि.2 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या कक्ष क्रमांक 11 अर्थात स्थानिक गुन्हा शाखेमध्ये ऑपरेशन करण्यात निष्णात असणाऱ्या डॉक्टाराने एक गुप्त मिटींग बोलावली होती. त्यामध्ये जुबेर नावाचा एक माणुस होता आणि इतर चार लोक होते. ही सर्व मंडळी गुटखा व्यवसायाशी संबंधीत आहेत. नुसती संबंधीतच नाही तर कंटेनर भरून गुटखा मागवू शकतात अशी त्यांची ताकत आहे आणि अशा लोकांसोबत स्थानिक गुन्हा शाखेमध्ये एक कट रचुन मिटींग करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखा अशा लोकांसोबत मिटींग करण्यासाठी आहे काय? डॉक्टराची तर नियुक्तीच नाही आणि तो मिटींग कशी बोलावतो. गेली 36 महिने कोणत्या सक्षम अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशा वर तो कार्यरत आहे याचीच माहिती कार्यालयाला नाही. तरीपण त्याला असेले अधिकारी केव्हढे मोठे आहेत हे काल झालेल्या स्थानिक गुन्हा शाखेतील मिटींगमुळे समोर आले. रात्री 8 ते 8.30 म्हणजे पोलीस अधिक्षक कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या नसतेच पण कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज बंद केले नसतील ना. मग ही मंडळी का आली होती याचा शोध शहाजी उमापांनीच घ्यावा तरच सत्य समोर येईल.