आज उपचार घेणाऱ्या संतोष वडवळे व त्यांच्या कुटूंबियांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-जखमी अवस्थेतील शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळे, त्यांचे वडील आणि भाऊ यांच्यासह अनोळखी काही लोकांनी मिळून 1 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 2 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजेदरम्यान एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्याकडील सोन्याचा ऐवज लुटला हा सर्व प्रकारे वडवळे कुटूंबियांनी एकनाथ साहेबराव पवार रा.रामतिर्थ ता.लोहा यांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा संशय आहे असा मजकुर पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेला आहे.वडवळे कुटूंबियांवर ऍट्रॉसिटी कलमांसह दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बालाजी मारोती कोकरे रा.बळीरामपुर यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी सकाळी 6.37 वाजता हा गुन्हा दाखल केला आहे. कोकरे यांच्या सांगण्याप्रमाणे 1 ऑक्टोबर रोजी ते आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एन.7000 वर बसून मित्र विकास सुर्यवंशी सोबत मारतळाकडे जात असतांना नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील जवाहरनगरपासून थोड्या अंतरावर गरुडा हॉटेलसमोर काळ्या रंगाची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.14 के.डब्ल्यू0088 माझ्या दुचाकीसमोर उभी केली आणि त्यातून एकनाथ माधवराव वडवळे, श्रीकांत एकनाथ वडवळे, संतोष एकनाथ वडवळे व इतर दोन-तीन व्यक्ती खाली उतरले आणि त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून माझ्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी असा 45 हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. हा सर्व प्रकार वडवळे कुटूंबियांनी एकनाथ रावसाहेब पवार रा.रामतिर्थ ता.लोहा यांच्या सांगण्यावरून केल्याचा मला संशय असल्याचे तक्रारीत लिहिलेले आहे.

हा गुन्हा नांदेड ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक रेखा काळे यांनी दाखल केला आहे. या गुन्ह्यात ऍट्रॉसिटीची कलमे जोडली असल्याने हा गुन्हा तपासासाठी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!