नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील मरण पावलेल्या 235 पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार रुपये अनुदान वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक आरतीसिंह यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशात हे अनुदान 31 डिसेंबर 2024 पुर्वी संबंधीत मृत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले जावे असे म्हटले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 13 मरण पावलेल्या पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
सामाजिक सुरक्षा व कल्याण या अंतर्गत गृहविभागाने ठेव सलग्न विमा योजनेनुसार राज्यातील 235 मरण पावलेल्या पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार रुपये देण्याचा निर्णय दिला. हा निर्णय 31 डिसेंबर 2024 पुर्वी पुर्ण करायचा आहे.या निर्णयात नांदेड जिल्ह्यातील मरण पावलेले पोलीस अंमलदार पंडीत चिंचोळकर बकल नंबर 188, मोहन भोंगे बकल नंबर 2023, राजकुमार शेंडगे बकल नंबर 490, किशन धुर्वे बकल नंबर 1034, राजन्ना कसलोड बकल नंबर 2298, नागोराव केंद्रे बकल नंबर 345, शिवाजी जानकर बकल नंबर 191, किशन तेलंग बकल नंबर 5160, रमेश चव्हाण बकल नंबर 5016, तुकाराम जायभाये बकल नंबर 2182, हनुमंत केंद्रे बकल नंबर 1225, सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद माळाळे यांचा समावेश आहे.