तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक दोन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात स्वच्छता करणाऱ्या महिला सफाई कामगाराकडून 2 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्वच्छता निरिक्षकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी दोन दिवस अर्थात 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 1 मध्ये तोंडी आदेशावर स्वच्छता निरिक्षकाचे काम पाहणाऱ्या अकबर खान उस्मानखान (47) याने एका महिला कामगाराला तुझे खाडे झाले आहेत. पण त्याचा अहवाल पाठवायचा नसेल तर 4 हजार रुपये लाचेची मागणी केली. या लाच मागणीची पडताळणी 1 ऑक्टोबर रोजी झाली तेंव्हा पंचासमक्ष अकबर खानने पाच हजारांची लाच मागीतली आणि त्यातील पहिला हप्ता 2 हजार रुपये चैतन्यनगर भागातील एका मेडीकलसमोर स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास अटक केली. आज 2 ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधिकारी अंमलदारांनी महानगरपालिकेतील लाचखोर तोंडी आदेशावरील स्वच्छता निरिक्षक अकबर खानला न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.सी.व्ही.मराठे यांनी त्यास दोन दिवस अर्थात 4 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!