वृध्द महिलेचा विश्र्वासघात ; 71 हजारांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी)-एका 65 वर्षीय महिलेला तुला बॅंकेत पैसे भरता येणार नाहीत आणि तुझे पैसे भरण्याचे काम मी करून देतो म्हणून तिची 71 हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना लोहा बस स्थानकाजवळ घडली.
सुंदराबाई नामदेव गायकवाड(65) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंधार येथील पिंटू भगवान कदम (45) या व्यक्तीने त्यांना तुला घरकुल बांधून देतो, तुला शेतावर कर्ज काढून देतो, तुला बॅंकेत पैसे भरता येत नाहीत म्हणून त्यांच्याकडून आणि सोनाराच्या मोबाईलमधून वेगवेगळे 71 हजार रुपये घेतले.महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा कंधार येथील बनावट पावत्या दिल्या. पण मुळात बॅंकेत पैसे भरलेच नव्हते. ही घटना कळाल्यावर सुंदराबाई गायकवाड यांनी विचारणा केली असता पिंटू भगवान कदम हा त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होतो. हा सर्व प्रकार 4 एप्रिल 2024 रोजीच्या सायंकाळी 5 वाजता सुंदराबाई गायकवाड यांच्या घरी लोहा बसस्थानकासमोर घडला.
लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी 65 वर्षीय महिलेसोबत झालेली फसवणूक लक्षात घेवून लोहा पोलीस ठाण्यात विश्वासघात, ठकबाजी आणि जिवे मारण्याची धमकी या सदराखांली भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 506 प्रमाणे गुन्हा क्रमांक 338/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक निवळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!