निवडणुक आयुक्तांनी पेरले तेच उगवले
नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे निवडणुक आयुक्त तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मुख्य सचिवांसह सर्व नऊ पोलीस परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरिक्षक व उपमहानिरिक्षक तसेच 36 जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक आणि सचिव या पदातील असंख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून राम राज्य कसे येईल हे सविस्तर सांगितले. परंतू महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी त्यांनी सादर केलेल्या अहवालांची चर्चा केली तर ते अर्धवटच आहेत. त्यात असंख्य अधिकारी अद्याप बदललेले नाहीत. म्हणजेच मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार यांनी स्वत: जे पेरले त्याचेच पिक महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर आणले आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राच्या निवड णुका होईपर्यंत निवडणुक हा विषय वादाचाच आहे.
भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी तीन दिवसासाठी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. त्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रातील निवडणुकीची केलेली तयारी त्यांना पाहायची होती आणि कमतरता असतील त्या ठिकाणी सुचना द्यायच्या होत्या. पोलीस महासंचालकांच्यावतीने अपर पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दलचा अहवाल अर्धवटच होता. तसेच मुख्य सचिवांनी तर निवडणुक आयोगासमोर बदल्यांचा अहवालच सादर केला नाही.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचे 56 दिवस शिल्लक आहेत. याच राजीवकुमारांनी कोणती शिवसेना खरी, कोणती खोटी हे ठरवले, कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणती राष्ट्रवादी खोटी हे ठरवले आणि या परिस्थितीत महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला दिलेला प्रतिसाद हा हसण्यासारखा आहे. हरीयाणाच्या निवडणुकीत तर मतदानाच्या दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले तरी या राजीवकुमारांनी काहीच केले नाही. का असे होत असेल. याचा विचार केला तर मी नाही त्यातली म्हणत-म्हणत निवडणुक आयोग सुध्दा केंद्र शासनाच्या आहारी गेले आहे असेच म्हणावे लागेल.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात सुध्दा बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित
मुख्य निवडणुक आयुक्तांसमोर बदल्यांचा विषय आला असतांना जवळपास 100 अधिकाऱ्यांच्या बदल्या अजून केल्या नाहीत असे निवडणुक आयोगाला दिसले. हा 100 चा आकडा किती खरा, किती खोटा हे तर सादर करणारे अधिकारीच जाणू शकतात. या शिवाय जिल्हास्तरावर काय घडले आहे हे तर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच माहिती असेल. तसेच पोलीस विभागात सुध्दा तीच परिस्थिती असणार. नांदेड जिल्हा पोलीस दलात तर 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्यांना बदली केलेली आहे त्यांची कार्यमुक्ती सुध्दा झालेली नाही. तरी पण सर्व काही आलबेल सुरू आहे.