नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील देशी गायींना राज्य शासनाने “राज्यमाता-गोमाता’ अशी उपाधी देवून देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रेरणा मिळावी असा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयावर कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स व्यवसाय विभागाचे उपसचिव निवृत्ती वराळे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
प्राचीन काळापासून मानवी जिवनात गायींचे अनन्यसाधारण महत्व आहे. वैदीक काळात सुध्दा गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्व लक्षात घेवून त्यांना “कामधेनु’ असे संबोधिण्यात आले होते. राज्यात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या देशी गायी आढळतात मराठवाड्यात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी व विदर्भात गवळावू या देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकरित्या अधिक महत्व आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषण्यासाठी महत्वाचे अन्नघटक उपलब्ध असतात. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेदीक चिकित्सा पध्दतीतील पंचगव्यचा वापर होतो. शेंद्री शेती पध्दतीत देशी गायींचे शेन आणि गोमुत्र महत्वाची भुमिका वठवतात. देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे म्हणून पशुपालकांना देशी गायींचे पालन पोषण करण्यास प्रेरीत करण्यासाठी यापुढे देशी गायींना “राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. र ाज्य शासनाने हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202409301030174301 प्रमाणे आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.