नांदेड(प्रतिनिधी)-काल भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्तांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही काय करणार आहोत याचे सविस्तर विवेचन केले तेंव्हा असे वाटू लागले की, राम राज्यासारखी परस्थिती येईल. परंतू मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 69 मतदार संघामध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते मोजली गेली त्याचे उत्तर अद्याप स्पष्ट झाले नाही. महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक सुध्दा तशीच होणार आहे काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला.
महाराष्ट्र आणि झारखंडची विधानसभा निवडणुक जम्मू-काश्मिर आणि हरीयाणासोबतच होणार हे निश्चित असतांना झारखंड आणि महाराष्ट्र यांना वगळण्यात आले. सध्या जम्मू काश्मिर आणि हरीयाणा येथील निवडणुक सुरू आहे. 8 ऑक्टोबर रोजी त्याची मतमोजणी होणार आहे. बहुदा त्यानंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्र्वभूमीवर भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेवून येत्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणुक आयोगाची काय तयारी आहे याची माहिती दिली. राजीव कुमार यांच्या प्रमाणे निवडणुकांच्यावेळी मतदारांना कमीत कमी त्रास कसा होईल यासाठी आम्ही काय-काय तयारी केले आहे हे स्पष्ट केले. त्यांच्या लांबलचक स्पष्टीकरणातून आता भविष्यात महाराष्ट्रात राम राज्य येणार आहे असे अरुण गोयल यांना ऐकतांना वाटत होते. परंतू प्रत्यक्षात तसे घडणार आहे काय? आजपर्यंत लोकसभा निवडणुका-2014 मध्ये देशातील 69 लोकसभा मतदार संघांमध्ये झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतांची मोजणी झाली. तेच अद्याप स्पष्ट झाले नाही. मग महाराष्ट्र एक छोटसे राज्य आहे. त्यानुसार येथे काय होणार हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
जगात सर्वात प्रगल्भ प्रजासत्ताक अशी भारताची ख्याती असतांना भारताच्या लोकशाहीमध्ये होणारे घोटाळे सुध्दा जगात प्रसिध्द झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्व काही योग्य होईलच असे म्हणता येणार नाही. भारतीय संविधानाने मतदारांना दिलेल्या अधिकार मतदारांनी अत्यंत प्रभावीपणे वापरावा आणि कोणत्याही व्यक्तीला आपले अमुल्य मतदान देतांना त्यातील पात्रता जाणून घ्यावी. विचारवंत असे म्हणतात तुमच्यात धमक असेल तर जग तुमची दखल घेईलच. अशा पध्दतीची धमक असणाऱ्या विधानसभेतील उमेदवारालाच मतदान देणार असे या प्रगल्भ लोकशाहीतील सर्वात मुळ असलेल्या मतदारांनी ठरवावे एवढ्यासाठीच हा शब्द प्रपंच.