कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार

 

 *दिव्यांगांना कृत्रीम अवयव व सहायक उपकरणांचे वाटप*

नांदेड:-  इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाला आवश्यक कामांसाठी स्वयंपूर्ण करणे महत्त्वाचे आहे.कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे प्रतिपादन लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.

जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रमाच्या सीएसआर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवार २८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले.

यावेळी देवसटवार बोलत होते व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, अधिक्षक वाय. एच. चव्हाण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, अलीम्कोचे कनिष्ठ प्रबंधक कमलेश यादव, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, कमल कोठारी, अंकिता अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवारसह मान्यवरांनी विचार मांडले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना मोटाराईज्ड ट्रायसीकल, कव्हेंश्नल ट्रायसीकल, श्रवणयंत्र, ब्रेल कीट, स्मार्ट मोबाईल फोन, स्मार्ट केन, क्रचेस, व्हिल चेअर, सी.पी. चेअर, चालण्याची काठी, रोलेटर, वॉकर इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापू दासरी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!