मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड

नांदेड  : -औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी शाळा, महाविद्यालय, महामंडळे, एमएसईबी अशा विविध 65 आस्थापनांनी  प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती आयोजित केल्या होत्या. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बारावी, पदवी, पदवीका उत्तीर्ण अशा जवळपास 645 उमेदवारांनी या मेळाव्यात नोंदणी केली. त्यापैकी 400 पेक्षा अधिक उमेदवाराना प्राथमिक निवड विविध आस्थापनावर करण्यात आली आहे.

कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनविण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य मेळावा आयोजित करण्यात येत आहेत.

या मेळाव्यास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर, संस्थेचे प्राचार्य एस.व्ही सुर्यवंशी, उपप्राचार्य व्ही.डी. कंदलवाड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याचे समन्वयक म्हणून गटनिदेशक शेख जी.जी यांनी काम पाहीले. तर  सूत्रसंचालन एस.एम. राका यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे गटनिदेशक के.टी. दासवाड, व्ही.पी. भोसीकर, आर.ई. काबंळे, एस.एम.खानजोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एम.जी.कलंबरकर व सर्व शिल्पनिदेशकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!